भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड

  • विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांची १२ सप्टेंबर २०२१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.
  • भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचे मुख्यमंत्रीपद गेले आहे.
  • ते कडवा पाटीदार समाजाचे नेतृत्व करतात.
  • गुजरातचे राज्यपाल आचार्य देव्रत यांनी पटेल यांना गुजरातचे १७वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.
  • भूपेंद्र पटेल यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
  • राजकारणात पूर्णत: प्रवेश करण्याअगोदर ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण (एयूडीए)चे अध्यक्ष होते.
  • घाटलोदिया विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच २०१७ मध्ये गुजरात विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले.
  • १९९९-२००१ दरम्यान पटेल अहमदाबाद नगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
  • २००८-१० मध्ये अहमदाबाद नगरपालिका शालेय बोर्डाचे उपाध्यक्ष होते, तर २०१०-१५ दरम्यान अहमदाबादच्याच थालतेज प्रभागाचे कौन्सिलर म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला आहे.
  • ते सरदारधाम विश्व पाटीदार केंद्राचे विश्वस्त विश्व उमिया फाउंडेशनचे अध्यक्षही आहेत.
  • दादा भगवान यांनी स्थापन केलेल्या अक्रम विज्ञान चळवळीचे ते अनुयायी आहेत.

Contact Us

    Enquire Now