भारत आणि लोकसंख्या नियोजन

भारत आणि लोकसंख्या नियोजन :

  • १९५२ : कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.
  • १९६६ : आरोग्य मंत्रालयाअंतर्गत कुटुंबनियोजन विभागाची स्थापना
  • १९७६ : पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण
  • २००० : दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण
  • अल्पकालीन लक्ष्य : एकात्मिक आरोग्य सुविधा प्रस्थापित करणे.
  • मध्यमकालीन लक्ष्य: २०१० पर्यंत एकूण जननदर २.१ एवढा करणे. (म्हणजेच पुनःस्थापनेच्या पातळीपर्यंत आणणे)
  • दीर्घकालीन लक्ष्य : २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे.
  • १९४० पासून ते २००० सालापर्यंत भारताचा लोकसंख्या वाढीचा दर हा सतत २० टक्क्यांच्या वर राहिला आहे.
  • २००१ ते २०११ या दशकामध्ये पहिल्यांदाच तो १७.७ % एवढा खाली आला आहे.
  • भारत लोकसंख्यावाढीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढत असते परंतु तिच्या वाढीचा दर हा घट दर्शवतो.
  • परंतु बिहार,उत्तरप्रदेश यांसारखी अविकसित राज्ये ही अजूनही दुसऱ्या टप्प्यातच आहेत.
  • १९११ ते १९२१  या दशकामध्ये लोकसंख्या ०.३१ टक्‍क्‍यांनी कमी झाली होती. म्हणून १९२१ या वर्षास ‘महाविभाजक वर्ष’ म्हटले जाते.
  • २०११च्या जनगणनेनुसार १५ ते ५९ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण ५७.११ टक्के आहे. तसेच ० ते १४ वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण ३५.४४% आहे.
  • येणाऱ्या वीस वर्षांमध्ये भारतात जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असेल. यालाच लोकसंख्याशास्त्रीय लाभांश (demographic dividend) असे म्हणतात.
  • परंतु या तरुण लोकसंख्येला उचित शिक्षण आणि रोजगार न मिळाल्यास हीच लोकसंख्या देशासाठी ओझे सुद्धा ठरू शकेल.

Contact Us

    Enquire Now