भारत आकाश क्षेपणास्र प्रणालीची निर्यात करणार

भारत आकाश क्षेपणास्र प्रणालीची निर्यात करणार

  • पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेची निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • आकाशच्या निर्यातीला चालना देण्यासाठी उच्चस्तरीय समिती गाठित केली आहे.
  • या समितीत संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा समावेश.
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, स्वावलंबी भारत मिशन अंतर्गत देश संरक्षण क्षेत्रात उत्पादन क्षमता वाढवत आहे. क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमताही पाठवत आहे.
  • निर्यात केले जाईल अशा आकाश क्षेपणास्त्राची आवृत्ती भारतीय सैन्याच्या ताफ्‍यात समाविष्ट असलेल्या क्षेपणास्त्रापेक्षा वेगळी असेल.
  • फेब्रुवारी २०२० मध्ये लखनौमध्ये झालेल्या “डीफेन्स एक्स्पोज” (Defence expose) मध्ये आकाश क्षेपणास्त्राच्या आयातीस भारताच्या मित्रदेशांनी रुची दाखवली होती.
  • भारताने २०२५ पर्यंत ३५ हजार करोड क्षेपणास्त्र निर्यात करण्याचे लक्ष्य

आकाश क्षेपणास्त्र

  • जमिनीवरून हवेत मारा करणारा
  • संपूर्णपणे भारतीय बनावटीचे
  • ध्वनीच्या साडेतीनपट वेगाने प्रवास करते.
  • आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल लाँचवरून डागण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे.
  • उत्पादक – डीआरडीओ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research And Development Organisation)
  • पल्ला – ६० किमी
  • वजन – ७२० किलो
  • वेग – ३.५५ पट (ध्वनीच्या)
  • लांबी – ५.२ मी
  • पहिली चाचणी – १९९०
  • आकाश (SAM) – भारतीय हवाई दलात – २०१४ला दाखल

भारतीय लष्करात – २०१५ ला दाखल

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation DRDO)

  • स्थापना – १९५८
  • मुख्यालय – DRDO भवन दिल्ली
  • मंत्रालय – संरक्षण मंत्रालय
  • संरक्षण मंत्री – राजनाथ सिंह
  • परराष्ट्र मंत्री – सुब्रह्मण्यम जयशंकर
  • मोटो – बलस्य मूल विज्ञानम्‌ [“Strengths Origin is in Knowledge”]

क्षेपणास्त्र आयातीतील अग्रेसर देश

  1. सौदी अरेबिया
  2. भारत
  3. ऑस्ट्रेलिया
  4. इजिप्त
  5. चीन

क्षेपणास्त्र निर्यातीत अग्रेसर देश

  1. युनायटेड स्टेट
  2. इंग्लंड
  3. रशिया
  4. फ्रान्स

Contact Us

    Enquire Now