भारतीय सैन्याला संयुक्त राष्ट्रांचे पदक

भारतीय सैन्याला संयुक्त राष्ट्रांचे पदक

  • दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मिशनमध्ये काम करणाऱ्या भारतीय सैन्याच्या एकूण ८३६ सैनिकांना त्यांच्या सेवांसाठी संयुक्त राष्ट्र पदक देण्यात आले. (ऑक्टोबर २०२१)
  • शांतीसेने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या सैनिकांना अशांत भागात नागरिक, पोलिस, लष्करी कर्मचारी यांच्या संरक्षणाचे तसेच मानवतावादी मदत वितरणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करावे लागते.

शांतीसेना

  • स्थापना = १९४५ (संयुक्त राष्ट्रांतर्गत)
  • शांतीसेना दिवस = २९ मे
  • ‘ब्लू हेल्मेट’ असाही उल्लेख. 
  • संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये स्वत:चे सैन्यदल उभारण्याची तरतूद आहे, मात्र असे कोणतेही सैन्यदल उद्याप उभारले नाही. त्यामुळे आपली सर्व शांतता अभियान साध्य करण्यासाठी शांतीसेनेची मदत घेतली जाते.
  • रचना – शांतीसेनेच्या स्वयंसेवकाने वयाची २५ वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही. सदस्य राष्ट्राला शांतता करार केल्यानंतर शांतीसेनेचा सदस्य होता येते.
  • भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या राष्ट्रांना आतापर्यंत सर्वाधिक योगदान दिले आहे.

वित्तपुरवठा

  • शांतीसेनेला देण्यात येणारा वित्तपुरवठा ही सर्व सदस्य राष्ट्रांची संयुक्त जबाबदारी आहे.
  • प्रत्येक राष्ट्र संबंधित वाटा देण्यास कायदेशीर बंधनकारक आहे. यामध्ये सुत्रानुसार प्रत्येक राष्ट्राला आपला वाटा द्यावा लागतो.

Contact Us

    Enquire Now