भारतीय विद्यापीठांचा पुन्हा जगभरात डंका

भारतीय विद्यापीठांचा पुन्हा जगभरात डंका

    • शिक्षणक्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भारतीय शिक्षण संस्थांनी ठसा उमटविला आहे.
    • सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगने ‘जागतिक विद्यापीठ क्रमवारी – २०२१/२२’ जारी केली असून त्यामध्ये शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत भारतीय विद्यापीठे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
    • या क्रमवारीमध्ये आयआयएम अहमदाबादला ४१५वे स्थान मिळाले असून त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) ४५९व्या स्थानी आहे.
    • या क्रमवारीमध्ये झळकलेल्या अन्य संस्थांमध्ये जेएनयू, बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयटी रुरकी, आयआयटी गुवाहाटी, एम्स नवी दिल्ली, जादवपूर आणि कोलकाता विद्यापीठ आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांचा समावेश आहे.
    • जागतिक पातळीवर हार्वर्ड विद्यापीठाने या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले असून त्यानंतर मॅसॅच्युसेट्‌स् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांचा क्रमांक लागतो.
    • जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२१-२२ मध्ये जगभरातील २००० संस्थांचा समावेश असून भारतातील ६८ संस्थांना या क्रमवारीमध्ये स्थान मिळाले आहे.

 

देशातील दहा आघाडीच्या संस्था :

 

क्रमवारीतील स्थान संस्था
४१५ आयआयएम, अहमदाबाद
४५९ आयआयएससी, बंगळूरू
५४३ टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई
५५७ आयआयटी, मद्रास
५६७ आयआयटी, मुंबई
५७१ दिल्ली विद्यापीठ
६२३ आयआयटी, दिल्ली
७०८ आयआयटी, खरगपूर
७०९ पंजाब विद्यापीठ
८१८ आयआयटी, कानपूर

Contact Us

    Enquire Now