भारतात यूएनजीडब्ल्यूआयसीची दुसरी बैठक

भारतात यूएनजीडब्ल्यूआयसीची दुसरी बैठक

  •  संयुक्त राष्ट्राच्या जागतिक भौगोलिक माहिती काँग्रेसची (यूएनजीडब्ल्यूआयसी) दुसरी बैठक ऑक्टोबर २०२२ मध्ये हैदराबाद येथे पार पडणार आहे.
  • ‘आजादी का अमृतमहोत्सव’ चा भाग म्हणून भारतात याचे आयोजन केले जात आहे.
  • या कार्यक्रमात भारतात विकसित होत असलेल्या भू-स्थानिक परिसंस्थांची झलक बघायला मिळेल.
  • संयुक्त राष्ट्राच्या जागतिक भौगोलिक माहिती काँग्रेसची (United Nation World Geospatial Information Congress- UN-WGIC):
  • आयोजन: संयुक्त राष्ट्र ग्लोबल जिओ-स्पॅशियल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट वरील तज्ज्ञांची समिती
  • दर चार वर्षांनी ही बैठक आयोजित केली जाते.
  • पहिली बैठक: ऑक्टोबर २०१८ (चीन)

उद्देश: सदस्य देश आणि भौगोलिक माहिती व्यवस्थापन आणि क्षमतांमध्ये संबोधित भागधारकांत आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे.

२०२२ ची थीम:

  • ‘Towards Geo-enabling the global village’

जिओ-स्पॅशियल डेटा म्हणजे काय?

  • यालाच जिओ-डेटा असेही म्हटले जाते. यात स्थानासंबंधित माहिती दिलेली असते, ज्यात पत्ता क्षेत्र किंवा झिप (झोन सुधारित आराखडा) कोड या डेटासेटशी जोडलेला असतो.

भू-स्थानिक तंत्रज्ञान:

या तंत्रज्ञानाने अंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो-

1.    रिमोट सेन्सिंग

2.    भौगोलिक माहिती प्रणाली

3.    ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम

4.    थ्रीडी स्कॅनिंग

भारताचे भू-स्थानिक धोरण:

1.    स्वामित्व योजना: ग्रामीण लोकसंख्या सशक्त करण्यासाठीची ही योजना असून  याअंतर्गत ग्रामीण जमीन धारकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाते.

2.    सारथी

3.    ऑनलाईन मॅप्स (नकाशा) पोर्टल

4.     मंचित्रण(Mannchitran): नॅशनल  ॲटलास अॅण्ड थिमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन (NATMO) ने या पोर्टल वर भारताचे सांस्कृतिक, आर्थिक व प्राकृतिक नकाशे प्रसिद्ध केले आहेत.

5.    भुवन पोर्टल (इस्रो).

Contact Us

    Enquire Now