भारतात मर्यादित आपत्कालीन वापरासाठी ‘मॉडर्ना’ला मान्यता

भारतात मर्यादित आपत्कालीन वापरासाठी ‘मॉडर्ना’ला मान्यता

  • भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डिसीजीआय) अमेरिकेतील ‘मॉडर्ना’ कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे.
  • या लसीच्या आयातीसाठी मॉडर्नाची भारतातील भागीदार औषध कंपनी ‘सिप्ला’स डिसीजीआयने परवानगी दिली आहे.
  • कोव्हॅक्सच्या माध्यमातून मॉडर्ना तसेच mRNA- १२७३ च्या काही लसमात्रा भारताला देणगी स्वरूपात पुरवण्यास अमेरिकन सरकारने मान्यता दिली आहे.

उद्देश : 

अ) देशाच्या लसीकरण मोहिमेला बळ देणे.

ब) देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण लसीकरणासाठी वेगवान लससाठा उपलब्ध करणे.

वापर कधी?

  • सिप्लाद्वारे प्रथम १०० लसलाभार्थ्यांचे आठवड्याभराचे सुरक्षा मूल्यमापन केल्यानंतरच लसीकरण मोहिमेत या लसीचा वापर करण्यात येईल.

तपासणी : केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कसौली (हिमाचल प्रदेश)

मॉडर्नाची वैशिष्ट्ये :

अ) साठवण :

i) ७ महिन्यांपर्यंत (-)२५ अंश ते (-)१५ अंश सेल्सिअस तापमान

ii) ३० दिवसांसाठी २ अंश ते ८ अंश सेल्सिअस तापमान

ब) दुसरी मात्रा : २८ दिवसांनंतर

भारतातील उपलब्ध इतर कोरोना प्रतिबंधक लसी व त्यांची परिणामकारकता

क्र. कोरोना प्रतिबंधक लस परिणामकारकता
१) कोविशील्ड ७४%
२) कोव्हॅक्सिन ७७.८%
३) स्पुटनिक ९१%
४) मॉडर्ना ९४%

Contact Us

    Enquire Now