भारतात एकल प्लॅस्टिक वापरास २०२२ पासून बंदी

भारतात एकल प्लॅस्टिक वापरास २०२२ पासून बंदी

  • प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या पर्यावरणीय संकटाचा धोका कमी करण्यासाठी २०२२ पासून बहुतांश एकल वापराच्या प्लॅस्टिक (सिंगल-यूज प्लॅस्टिक) वर बंदी घालणार आहे.
  • बहुतांश एकल- वापर प्लॅस्टिकवर बंदी १ जुलै २०२२ पासून लागू होईल.

पार्श्वभूमी :

  • ऑगस्ट २०२१ मध्ये सरकारने प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम-२०२१ अधिसूचित करून सरकारने एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
  • २०२२ पर्यंत भारताला एकल वापर प्लॅस्टिकमुक्त करण्याचे ध्येय २०१९ मध्ये केंद्र सरकारने ठरविले आहे.

एकल वापराचे प्लॅस्टिक म्हणजे –

  • किराणा पिशव्या, प्लॅस्टिकचे कप, प्लेट, ग्लास, चमचे, स्ट्रॉ यासारख्या फक्त एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या अथवा फार क्वचितच त्यांचा पुनर्वापर केला जातो अशा वस्तूंचा समावेश होतो.

प्लॅस्टिकच का?

  • प्लॅस्टिक स्वस्त, हलके आणि उत्पादन करण्यास सोपे असल्याने गेल्या शतकापासून त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे; परिणामी आज जगातील अनेक देश प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास संघर्ष करत आहेत.
  • भारतात केवळ ६० टक्के प्लॅस्टिक कचरा गोळा केला जातो, तर उर्वरित १०,३७६ टन (४०%) कचरा पर्यावरणात तसाच राहतो.

रणनिती :

  • एका सरकारी समितीने सिंगल यूज प्लॅस्टिकच्या उपयोगिता आणि पर्यावरणीय प्रभावांच्या निर्देशांकानुसार तीव्र टप्प्यांतील बंदी प्रस्तावित केली आहे.

अ) पहिला टप्पा : या श्रेणीत फुगे, झेंडे, कँडी, आईसक्रीम, इअर बड्‌समध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या काड्या, सजावटीत वापरला जाणारा थर्माकॉल इ. चा समावेश होतो.

ब) दुसरी श्रेणी :  यावर १ जुलै २०२२ पासून बंदी घालण्याचे प्रस्तावित केले आहे. यात प्लॅस्टिक कप, प्लेट्‌स्‌, चमचे, ग्लास, चाकू, कटलरीसारख्या वस्तू तसेच निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पाकिटे, १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे स्टिरर्स आणि प्लॅस्टिक बॅनर आदींचा समावेश होतो.

क) तिसरी श्रेणी : सप्टेंबर २०२२ पासून बंदी; यात २४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या न विणलेल्या पैशांचा समावेश होतो.

आव्हाने :

  • भारतात दररोज २६००० टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो.
  • नद्या, महासागरांमध्ये प्लॅस्टिकच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रवाळ, शैवाल व अन्य सूक्ष्म जीव लुप्त होत आहेत, ज्यामुळे परिसंस्था बिघडते.

 

सरकारचे प्रयत्न :

 

अ) इंडिया प्लॅस्टिक चॅलेंज हॅकेथॉन – २०२१

ब) एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तुंमुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल जागृत करण्यासाठी देशव्यापी निबंध स्पर्धा

Contact Us

    Enquire Now