भारतातील चार नवीन स्थळांचा रामसार यादीत समावेश

भारतातील चार नवीन स्थळांचा रामसार यादीत समावेश

  • भारतातील चार नवीन स्थळांचा १४ अॉगस्ट २०११ रोजी रामसार यादीत समावेश करण्यात आला.
  • यामुळे भारतातील रामसार स्थळांची एकूण संख्या आता ४६ झाली आहे. 
  • भारतातील १०,८३,३२२ हेक्टर क्षेत्रफळ रामसार यादीतील पाणथळ जागांनी व्यापले आहे. 
  • गुजरातमधील नाल सरोवर (२०१२) नंतर रामसर यादीत समाविष्ट होणारे थोल तलाव वन्यजीव अभयारण्य व वाधवाना आर्द्रभूमी ही अन्य दोन स्थळे आहेत.

प्रथमच हरियाणातील सुल्तानपुर राष्ट्रीय अभयारण्य व भिंडावास वन्यजीव अभयारण्य या दोन स्थळांचा रामसार यादीत समावेश करण्यात आला.

अ) भिंडवास वन्यजीव अभयारण्य:

  • हरियाणातील सर्वात मोठी मानवनिर्मित गोड्या पाण्याची पाणथळ जागा आहे.
  • याची स्थापना वर्ष १९८६ मध्ये झाली आणि ३ जून २००९ रोजी भारत सरकारकडून त्याला पक्षी अभयारण्य देखील घोषित करण्यात आले. 
  • हे ४.१२ चौरस किमी क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. 
  • जवाहरलाल नेहरू कालव्यातून अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी हे बांधण्यात आले होते. 
  • २५०हून अधिक प्रजाती आणि निवासी पक्ष्यांचे ३०,०००हून अधिक स्थलांतरित पक्षी वर्षभर भिंडवास पक्षी अभयारण्याला भेट देतात. उन्हाळ्यात संख्या कमी होते आणि हिवाळ्यात वाढते.

ब) सुल्तानपुर राष्ट्रीय उद्यान:

  • जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून विचार केला असता हरियाणातील सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानात २२० पेक्षा अधिक जलचर प्राणी, पक्षी यांच्या दुर्मिळ प्रजातींना संरक्षण मिळत आहे. 
  • १९७२मध्ये यास पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले तर, १३ जुलै १९८९ रोजी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.
  • यात रहिवासी जलचर/पक्षी, हिवाळी स्थलांतरित जलचर/पक्षी आणि स्थानिक स्थलांतरित जलचर तसेच पक्ष्यांचा समावेश आहे.
  • यात प्रामुख्याने लॅपविंग (sociable lapwing) सारख्या जागतिक पातळीवर नष्ट होण्याचा गंभीर धोका असलेल्या प्रजातींचा तसेच लुप्तप्राय इजिप्शियन गिधाड, सकर फाल्कन, पॅलास फिश ईगल आणि ब्लेक-बेलीड टर्न यांचा समावेश आहे.

क) थोल वन्यजीवन अभयारण्य (गुजरात):

  • गुजरातमधील थोल तलाव वन्यजीव अभयारण्य, पक्षासाठी मध्य आशियाई उड्डाण मार्गावर आहे.
  • १९८८मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
  • या ठिकाणी ३२०हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. इथल्या पाणथळ परिसरात ३०पेक्षा जास्त धोक्यात असलेल्या जलचर पक्षांच्या प्रजाती आढळतात. 
  • यामध्ये व्हाईट – रम्ड गिधाड, लॅपविंग आणि असुरक्षित सारस क्रेन, कॉमन पोचार्ड आणि लेसर व्हाईट – फ्रंटेड हंस अशा दुर्मिळ प्रजाती आहेत. 

ड) वाधवाना आर्द्रभूमी (गुजरात):

  • गुजरातमधील वाधवाना पाणथळ ठिकाण पक्षी जीवनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महत्त्वाचे ठिकाण आहे. 
  • या ठिकाणी हिवाळ्यात स्थलांतरित जलपक्षी आश्रय घेतात. यामधे मध्य आशियाई उड्डाण मार्गावरून स्थलांतरित होणाऱ्या ८०पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश आहे. 
  • त्यात पल्लास फिश-ईगल, असुरक्षित कॉमन पोचर्ड डाल्मेटियन पेलिकन, ग्रे-हेडेड फिश-ईगल आणि फेरुगिनस डक अशा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचा समावेश आहे.

पाणथळ स्थळांचे महत्त्व:

  • पाणथळ स्थळांमुळे अन्न, पाणी, तंतुमय पदार्थ, भूजल पुनर्भरण, जलशुद्धीकरण, पूरनियंत्रण, धूपनियंत्रण व हवामान नियमन यांसारख्या महत्त्वपूर्ण संसाधनांचा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक सेवांचे लाभ मिळतात. 
  • ही ठिकाणे पाण्याचा प्रमुख स्रोत असून आपल्याला ताज्या स्वच्छ पाण्याचा मुख्य पुरवठा यांद्वारे होतो. 
  • पावसाचे पाणी ती शोषून घेतात व भूजल पुनर्भरणास सहाय्य करतात.

रामसार करार:

  • हा करार दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला आहे. 
  • इराणमधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१मध्ये हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला आणि १९७५पासून हा करार अमलात आला. 
  • एकाच परिसंस्थेवर भर देणारा हा एकमेव जागतिक करार आहे. 
  • कराराचे प्रमुख तीन आधारस्तंभ: 

अ) धोरणी वापर 

ब) रामसार यादी

क) आंतरराष्ट्रीय सहकार्य 

  • करारानुसार पाणथळ प्रदेशामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: 
  • दलदल, पूर मैदाने, नद्या व तलाव, खारफुटी, कोरल रीफ्स, ६ मीटर्सपेक्षा जास्त खोली नसलेले इतर सागरी भाग, तसेच अशुद्ध – पाण्याचे १७ शुद्धीकरण तलाव आणि जलाशय असे मानवनिर्मित पाणथळ प्रदेश. 

भारतातील पाणथळ प्रदेशाची स्थिती:

  • पाणथळ क्षेत्र (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, २०१७ नुसार देशातील पाणथळ क्षेत्राचे नियमन केले जाते.
  • २०१०च्या नियमांमध्ये केंद्रीय पाणथळ क्षेत्र नियामक प्राधिकरणाची तरतूद होती. 
  • २०१७च्या नियमानुसार त्याऐवजी राज्यस्तरीय संस्था आणि केंद्रीय पाणथळ क्षेत्र समितीची स्थापना करण्यात आली. 
  • या नवीन नियमानुसार बॅकवाॅटर, लगून, खाडी आणि वाट्या (estuaries) यांना पाणथळ क्षेत्राच्या व्याख्येतून वगळण्यात आले आहे.

मौट्रिक्स नोंदी: 

  • रामसर यादीचा एक भाग म्हणूनच मौट्रिक्स नोंदीमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे किंवा प्रदूषणामुळे परिस्थितिकीय बदल झालेले आहे किंवा नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे, अशा दलदलीय परिसंस्थांचा या नोंदीमध्ये समावेश केला जातो. 
  • सध्या भारतातील दोन पाणथळ क्षेत्र मौट्रिक्स नोंदीमध्ये समाविष्ट आहेत: 

अ) केवलदेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान) 

ब) लोकतक सरोवर (मणिपूर). 

  • पूर्वी चिल्का सरोवराचाही (ओदिशा) या नोंदीमध्ये समावेश होता मात्र नंतर २००२ मध्ये त्यास बाहेर काढण्यात आले आहे.
  • भारतातील रामसारस्थळे: सध्या भारतात एकूण ४६ रामसर स्थळे आहेत.
  • सर्वाधिक रामसार स्थळे असलेली राज्ये:

अ) उत्तर प्रदेशमध्ये (८)

ब) पंजाब (६) 

  • भारताचे पहिले दोन रामसार स्थळे:

अ) चिल्का सरोवर (ओदिशा) 

ब) केवलदेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान) 

  • महाराष्ट्रातील रामसर स्थळे: 

अ) नांदूर मधमेश्वर (नाशिक)

ब) लोणार (बुलढाणा) 

  • जागतिक पाणथळ दिन: दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. 
  • या कराराचे सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२१ मध्ये साजरे केले जात आहे. 
  • २०२१ची थीम: आर्द्र भूमी आणि पाणी (Wetlands and Water)

या दिनानिमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (NCSCM : National Centre for Sustainable Coastal Management) चा एक भाग म्हणून वेटलँड संरक्षण आणि व्यवस्थापन केंद्र सुरू केले.

Contact Us

    Enquire Now