भारताच्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी

भारताच्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी – 

  • 22 ऑक्‍टोबर रोजी भारताने राजस्थानच्या पोखरण फील्ड, फायरिंग रेंज येथे ‘नाग’ या रणगाडाभेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (Anti Tank Guided Missile (ATGM)) 10वी व अखेरची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.
  • आता भारतीय सैन्यात दाखल होण्यास हे क्षेपणास्त्र सज्ज झाले आहे.
  • नाग क्षेपणास्त्र हे नाग क्षेपणास्त्र वाहकातून (NAMICA) सोडण्यात आले.
  • शत्रूच्या रणगाड्यांची आगेकूच थांबवण्यासाठी संरक्षण, संशोधन व विकास संघटनेने (DRDO) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
  • नाग क्षेपणास्त्र जमीन व हवा दोन्ही ठिकाणावरून लाँच करू शकतो.
  • 3rd Generation ATGM असलेले हे क्षेपणास्त्र 4-7 कि.मी. दूरी वरील शत्रूचे रणगाडे दिवसा तसेच रात्री भेदू शकते.
  • रणगाड्यांविरुद्ध भारत सध्या 2nd Generation मिलान 2T व कोंकूर ATGM वापरत आहे.
  • यापूर्वी 15-16 जुलै 2020 रोजी DRDO ने ओदिशाच्या बालासोर किनाऱ्यावर ‘ध्रुवास्त्र’ या ATGM ची हेलीकॉप्टर विना चाचणी घेतली.

संरक्षण, संशोधन व विकास संघटना 

Defence Research and Development Organisation (DRDO) 

  • अध्यक्ष – डॉ. द. सतीश रेड्डी
  • मुख्यालय – नवी दिल्ली
  • संबंधित मंत्रालय – संरक्षण मंत्रालय
  • संरक्षण मंत्री – राजनाथ सिंग

Contact Us

    Enquire Now