भारताचा व्याघ्र गणनेत विश्वविक्रम

भारताचा व्याघ्र गणनेत विश्वविक्रम

  • २०१८ साली व्याघ्र गणना करताना भारतीय वन विभागाने कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीचा वापर केला. या पद्धतीने व्याघ्र गणना करत असताना भारताने जगातील सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅपिंग वन्यजीव निरीक्षणाचा विश्वविक्रम केला.
  • कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीने भारतीय वन विभागाने १,२१,३३७ चौरस कि.मी. पट्ट्याची पाहणी केली. सध्या भारतात २४६१ वाघ आहेत. (जगाच्या एकूण ७७%)
  • भारतात मध्य प्रदेशात सर्वात जास्त वाघ आहेत. त्या खालोखाल कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांचा क्रमांक लागतो. भारतातील ५० व्याघ्र प्रकल्प NTCA व्याघ्र प्रकल्पांतर्गत सांभाळते.
  • आंध्रप्रदेशातील नागार्जुनसागर-श्रीशैल्यम् हे भारतातील सर्वात मोठे व्याघ्र अभयारण्य आहे. तसेच जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पात सर्वात जास्त वाघ आहेत.
  • वर्ल्ड वाइल्ड लाइफ या संस्थेने ‘T×२’ हा प्रकल्प वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी सुरू केला आहे. दक्षिण आशिया खंडात एकूण १३ राष्ट्रांमध्ये वाघ आढळतात.

Contact Us

    Enquire Now