भागधारकांना दिलासा

भागधारकांना दिलासा –

  • भागभांडवल परत करण्यास रिझवर्ह बँकेची सहकारी बँकांना परवानगी.
  • भागभांडवल परत मिळण्याचा मार्ग मोकळा, मात्र लाभांश वाटपास अजूनही मनाई असल्याने त्याबाबत आरबीआयने लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सहकारी बँकांच्या उच्चपदस्थांची मागणी केली.

तिढा काय?

  • सहकारी बँकाकडून कर्ज घेताना भागभांडवलाची अट असते.
  • मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा मिळत असल्याने भागभांडवलापोटी मोठी गुंतवणूक केली जाते.
  • पण, केंद्र सरकारच्या बँकिंग विनियमन कायद्यात 29 जून 2020 रोजी दुरुस्त केल्याने कलम 12 (2) (1) नुसार भागभांडवल परत करण्याबाबत सहकारी बँकावर निर्बंध.
  • कोरोना टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेसह बँकांना मोठा फटका बसल्याने बँकांची आर्थिक स्थिती बिघडू नये म्हणून आरबीआयने बँकांना लाभांश देण्यास मनाई केली.
  • सहकारी बँकेचे कर्ज घेताना तारण असल्यास अडीच टक्के व नसल्यास पाच टक्के समभाग खरेदी करावे लागतात.
  • काही महिन्यांमध्ये कर्जाची परतफेड करणाऱ्यांनाही भागभांडवल परत मिळत नव्हते.
  • ‘लोकसत्ता’ने 7 जानेवारीला ‘सहकारी बँकिंग परिषदेत’ हा मुद्दा उपस्थित केला.
  • रिझर्व्ह बँकेने भागभांडवल परत करण्याचे मुभा दिल्याने सहकारी बँका आणि भागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Contact Us

    Enquire Now