ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • 30 सप्टेंबर 2020 रोजी ओदिशाच्या चांदीपूर येथील ‘इंटिग्रेटेड टेस्ट रेंज’ (ITR) कडून सुमारे 400 किलोमीटरच्या स्ट्राइक रेंजसह पृष्ठभाग ते पृष्ठभाग सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. 
  • देशी बूस्टर, एअर फ्रेम विभाग, प्रोपल्शन सिस्टिम, वीजपुरवठा आणि इतर अनेक प्रमुख स्वदेशी घटकांसह ही चाचणी घेण्यात आली.
  • या चाचणीने देशी घटकांची क्षमता सिद्ध केली. जी उच्च स्ट्राइक रेंज मिळवण्यासाठी वापरली जात होती.

ठळक मुद्दे : 

  • DRDO च्या PJ-10 प्रकल्पांतर्गत गोळीबार चाचणी करण्यात आली.
  • भारत हा मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमे (MTCR) चा सदस्य बनल्यानंतर ब्राह्मोसची स्ट्राईक रेंज 290 कि.मी. वरून 450 कि.मी. पर्यंत वाढवण्यात आली.
  • हे 300 किलो वजनाचे पारंपरिक वॉरहेड ठेवण्यास सक्षम आहे.

ब्राह्मोसबद्दल थोडक्यात :

ठिकाण – इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर (ओदिशा)

क्षेपणास्त्राचे नाव – ब्रह्मपुत्रा (भारत), मोस्कोवा (रशिया) या नद्यांच्या नावावरून

उत्पादक – ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड (भारताच्या DRDO आणि रशियाच्या NPOM) चा संयुक्त उपक्रम

  • भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलात तैनात. 
  • जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल. 
  • रशियाच्या ‘पी-800 ऑनिक्स’ क्षेपणास्त्रावर आधारित. 
  • जमीन, पाणी आणि आकाशातून डागता येणार .
  • मारक पल्ला : 450 कि.मी.
  • लांबी : 4.8 मीटर
  • वजन : 3000 किलोग्रॅम
  • वेग : 2.8 ते 3 मॅक

अलिकडील संबंधित :

  • 7 सप्टेंबर 2020 रोजी DRDO ने दुसऱ्या प्रयत्नात स्वदेशी विकसित स्क्रॅमजेर प्रोपल्शन सिस्टिमचा वापर करून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोन्टर व्हेइकलची (HSTDV) यशस्वी चाचणी केली.

DRDO बद्दल :

  • अध्यक्ष : डॉ. जी. सतिश रेड्डी
  • मुख्यालय : नवी दिल्ली

Contact Us

    Enquire Now