बौद्ध परिक्रमा प्रकल्प

बौद्ध परिक्रमा प्रकल्प

  • २०१६ साली केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. 
  • या प्रकल्पाअंतर्गत बौद्ध धर्माशी संबंधित महत्त्वाची ठिकाणे एकमेकांना रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर इत्यादी मार्गांनी जोडण्याचे प्रस्तावित आहे. जेणेकरून पर्यटन विकासास चालना मिळेल.
  • गौतम बुद्धांचा जन्म झाला असे नेपाळमधील लुंबिनी तसेच सारणाथ आणि कुशीनगर इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांना या प्रकल्पांतर्गत जोडले जाणार आहे.
  • यातील चार मुख्य ठिकाणे : लुंबिनी – बोधगया- सारनाथ -कुशीनगर.

या प्रकल्पाअंतर्गत येणारी इतर ठिकाणे :

  • बोधगया, नालंदा, राजगीर, वैशाली, सारनाथ, श्रावस्ती, कुशीनगर, कौशंबी, संंकीसा आणि कपिलवास्तु. इ.
  • वरील ठिकाणी दरवर्षी सर्वसाधारणपणे ६ टक्के परदेशी पर्यटक भेट देतात येथे बौद्ध स्तूप आणि विहार आहेत.
  • सुरुवातीला या प्रकल्पांतर्गत केवळ ७ महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होता परंतु आता यात अजून २१ ठिकाणांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
  • प्रकल्पात समाविष्ट असणारी प्रमुख राज्ये –  मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, पश्चिम बंगाल, गोवा, गुजरात आणि जम्मू काश्मीर.
  • या प्रकल्पाला भारताचा महत्वाकांशी  प्रकल्प ‘उडान’ सोबतही जोडण्यात आले आहे. याअंतर्गत ४ आंतरराष्ट्रीय व २ प्रादेशिक विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे .

स्वदेश दर्शन प्रकल्प : 

  • हा प्रकल्प २०१५ मध्ये भारताच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे घोषित करण्यात आला.
  • या प्रकल्पाअंतर्गत महत्वाची पर्यटन क्षेत्रे जोडण्यात येत आहेत हा पूर्णपणे केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्प आहे .
  • या प्रकल्पांतर्गत १५ परिक्रमांचा समावेश होतो. बौद्ध परिक्रमा त्यापैकीच एक .

१) उत्तर-पूर्व भारत परिक्रमा

२) सागरी परिक्रमा

३) हिमालय परिक्रमा

४) कृष्ण परिक्रमा 

५) वाळवंटी भाग परिक्रमा 

६) पर्यावरण परिक्रमा 

७) वन्यजीव परिक्रमा 

८) आदिवासी परिक्रमा

९) ग्रामीण परिक्रमा 

१०) रामायण परिक्रमा 

११) वारसास्थळ परिक्रमा 

१२) सुफी परिक्रमा

१३) तीर्थंकर परिक्रमा 

१४) धार्मिक परिक्रमा

१५) बौद्ध परिक्रमा

महत्वाचे : 

  • लुम्बिनी (नेपाळ) – गौतम बुद्धांचा जन्म
  • कपिलवास्तु (उत्तर प्रदेश ) – शाक्य घराण्याची राजधानी तसेच  हे गौतम बुद्धांचे बालपणातील घर होते.
  • बोधगया (बिहार) – येथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.
  • सारनाथ (वाराणसी) उत्तर प्रदेश – बुद्धांनी येथे सर्वप्रथम उपदेश केला.
  • राजगीर, नालंदा (बिहार) – मगध राज्याची पहिली राजधानी. श्रावस्ती – कोसला राज्याची राजधानी.
  • कुशीनगर (उत्तर प्रदेश) –  बुद्धांचे महापरिनिर्वाण .

 भारतातील काही महत्त्वाची बौद्ध धार्मिक स्थळे :

१) अरुणाचल प्रदेश- बोमडीला व तवांग 

२) सिक्किम – कालिंपोंग, रूमटेक .

३) जम्मू काश्मिर- आंबाराणी.

४) हिमाचल प्रदेश – स्पिती, किंनोर, धर्मशाळा

६) मध्य प्रदेश – सांची, मुुरकोट 

७) महाराष्ट्र – कार्ले, वेरूळ, कान्हेरी, अजंठा, पितळखोरा, नाशिक लेणी.

८) आंध्र प्रदेश – नागार्जुनकोंडा, बोरा लेणी, अमरावती.

Contact Us

    Enquire Now