बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

  • ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी खासदार संभाजीराव उर्फ लालासाहेब काकडे यांचे वृद्धापकाळाने (वय ८९) पुण्यात निधन झाले.
  • ते बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झाले होते.
  • संभाजीराव काकडे हे जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्यासोबत देशातील समाजवादी चळवळीत होते.
  • माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर हे त्यांचे जवळचे मित्र, तर मोरारजी देसाई यांचे ते मानसपुत्र होते.
  • १९८२ मध्ये संभाजीराव काकडे यांनी ‘नांगरधारी शेतकरी’ हे चिन्ह घेऊन माजी खासदार शंकरराव पाटील यांचा धक्कादायक पराभव केला होता.
  • खेड मतदारसंघातून खासदारकीच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
  • शेवटपर्यंत ते समाजवादी धोरणांशी बांधिल राहिले होते.

Contact Us

    Enquire Now