बँकांच्या कर्ज नोंदणीसाठी, समान मुद्रांक

बँकांच्या कर्ज नोंदणीसाठी, समान मुद्रांक

  • मालमत्तांवर कर्ज घेताना केल्या जाणाऱ्या करारांवर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात एकसमानता आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
  • एखादी मालमत्ता विकण्यास अथवा खरेदी करताना त्यावर कर्ज घेतल्यास बँकांबरोबर करार करावा लागतो.
  • त्यासाठी मालमत्ता तारण आणि गहाण ठेवताना करण्यात येणाऱ्या करारांवर सध्या वेगवेगळे दर आकारण्यात येतात.
  • यापुढे सरसकट सर्व व्यवहारांवर एकूण करार रकमेच्या एकसमान असा ०.३% दर आकारण्यात येईल.
  • मुद्रांकशुल्क आकारणी, ऑनलाइन पद्धतीने दस्तांची नोंदणी, ऑनलाइन फायलिंग नोंदणीसाठी १५००/- रु. शुल्क आकारण्याचे ठरवले आहे.
  • सामान्य नागरिक, झोपडपट्टी-धारक, शेतकरी व अन्य असंघटित घटक यांना कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.

Contact Us

    Enquire Now