फिलिपाईन्स सरकारची अ जीवनसत्त्वयुक्त ‘गोल्डन राईस’ला मंजुरी

फिलिपाईन्स सरकारची अ जीवनसत्त्वयुक्त ‘गोल्डन राईस’ला मंजुरी

  • ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त सोनेरी तांदळाला परवानगी देणारा फिलिपाईन्स पहिला देश ठरला आहे.
  • हा तांदूळ जनुकबदल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने (Genetically modified-GM) ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त केला जाणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (ईरी) व तांदूळ संशोधन संस्था फिलिपाईन्स यांनी बिल व मेलिंडा गेट्‌स्‌ फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून या तांदळाचे संशोधन १९९३ पासून हाती घेतले होते.
  • अविकसित व विकसनशील देशात लहान मुलांना रातआंधळेपणा येतो. गोवरासारख्या आजाराला बळी पडतात. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी अनेक मुलांचा मृत्यू होतो.
  • जनुक अभियांत्रिकी पद्धतीने बनविलेला तांदूळ सोनेरी रंगाचा असल्याने त्याला गोल्डन राईस असे नाव ठेवण्यात आले.
  • ‘गोल्डन राईस’ हा ओरायझा सटायव्हा या उपगटातील वाण आहे. त्यात दोन जनुकांचा समावेश केल्यावर त्यात बिटाकॅरोटीन तयार होते. ते ‘अ’ जीवनसत्त्वाची निर्मिती करते.
  • ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शिअम योग्य प्रमाणात राहत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.
  • एरवी हे जीवनसत्त्व दूध व मांसाहारातून मिळते.
  • भारतात जनुकबदल पिकांच्या चाचण्या व लागवडीला परवानगी नाही.

Contact Us

    Enquire Now