प्रोजेक्ट बोल्ड ( BOLD )

प्रोजेक्ट बोल्ड ( BOLD )

  • नुकतेच ४ जुलैला खादी व ग्रामोद्योग आयोगाने ( Khadi & Village Industries Commission -KVIC ) राजस्थान मधील वाळवंटीकरण रोखण्यासाठी  बोल्ड ( BOLD –Bamboo Oasis on Lands in Drought ) हा प्रकल्प सुरू केला.
  • सदर प्रकल्प KVIC  च्या ‘खादी बांबू महोत्सव’ अंतर्गत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (७५ वर्षे ) साजरा करण्यासाठी सुरू केला गेला आहे.
  • या प्रकल्पांतर्गत KVIC ने राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील नीचलामांडवा या गावामध्ये ४ जुलैला एकाच दिवसात एकूण पाच हजार बांबूची लागवड करून जागतिक विक्रम नोंदवला.
  • या प्रकल्पाच्या माध्यमातून वाळवंटामध्ये हिरवळीचा प्रदेश निर्माण करणे, ग्रामीण उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे तसेच तेथील लोकांचे राहणीमान सुधारणे हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न KVIC  चा आहे
  • बांबू ही अतिशय लवकर येणारी गवत वर्गीय वनस्पती असून त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने  ते अवर्षणग्रस्त भागांमध्ये विशिष्ट महत्त्वाचे आहे. ४ जुलैला आसाममधील बांबूच्या BambusaTulda and Bambusa Polymorpha या प्रजातींची लागवड करण्यात आली होती.
  • आर्थिकदृष्ट्या बांबूपासून फर्निचर, अगरबत्त्या, संगीत उपकरणे ( बासरी वगैरे)  तसेच कागद आणि इतर हस्तकलेच्या वस्तू बनवता येतात. शिवाय इंधन म्हणूनसुद्धा त्या पासून कोळसा वगैरे मिळतो.
  • २७ जुलैला KVIC ने BSF च्या मदतीने जैसलमेर जवळील तानोत (Tanot ) गावामध्ये १००० रोपट्यांची लागवड केली.
  • KVIC ऑगस्ट २०२१ च्या अगोदर १५००० बांबूचे रोपटे पेरणार आहे. त्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलेरा व लेह-लद्दाख या प्रदेशाची निवड केली आहे.

Contact Us

    Enquire Now