प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर

प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर

  • भारतीय ज्येष्ठ भौतिकशास्रज्ञ प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट’ जाहीर झाला आहे.
  • भारत-फ्रान्स यांच्यामधील संयुक्त संशोधनाचा विकास आणि मूलभूत विज्ञानात संशोधनासाठी महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
  • प्रा. गोडबोले यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९५२ साली पुण्यात झाला.
  • त्यांचे शालेय शिक्षण हुजुरपागा शाळेत, महाविद्यालयीन शिक्षण सर परशुराम महाविद्यालयात झाले.
  • १९७२ साली पुणे विद्यापीठातून त्यांनी बी. एससी.ची पदवी आणि आयआयटी, मुंबईतून एम.एस.एसी.ची पदवी घेतली. पुढे अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी अॉफ न्यूयार्कमधून त्यांनी पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण केले.
  • त्या सध्या आय. आय. एस. सी. बेंगळुरूमधील ‘सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स’मध्ये कार्यरत आहेत. चाळीस वर्षांपासून त्या कण भौतिकी (Particle Physics), कोकायडर भौतिकी या विषयांमध्ये संशोधन करत आहेत.
  • भारतीय विज्ञान अकादमीच्या महिला संशोधनासाठी कार्यरत गटाच्या त्या अध्यक्षा आहेत. महिलांनी संशोधन क्षेत्रात पुढे यावे यासाठी त्या अनेक वर्षे काम करत आहेत.
  • त्यांनी मुंबई विद्यापीठात आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अध्यापनाचे कार्य केले आहे. प्रा. गोडबोले यांनी लेखन क्षेत्रातही योगदान दिले आहे. त्यांनी ‘लिलावतीज डॉटर्स’ या शंभर निवडक भारतीय संशोधनकांवरील पुस्तकाचे संपादन आणि सहलेखनही केले आहे.
  • ‘द गलर्स गाईड टू एक लाइफ इन सायन्स’ या पुस्तकाचेदेखील सहसंपादन केले आहे.
  • प्रा. गोडबोले यांनी आयआयएस सी बेंगळुरू आणि फ्रान्सची राष्ट्रीय संशोधन संस्था असणाऱ्या ‘सी. एन. आर. एस’ च्या इंन्डो-फ्रेंच लॅबोरेटरी इन थिओरॉटिकल हाय एनर्जी फिजिक्स सोबत मूलभूत संशोधनाच्या प्रोजेक्ट्समध्ये मोठे यश संपादन केले आहे.

 

प्रा. गोडबोले यांना प्राप्त सन्मान व पुरस्कार

 

  • २०२१ – नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट (फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान)
  • २०१९ – पद्मश्री
  • २०१५ – देवी पुरस्कार (न्यू इंडियन एक्स्प्रेस)
  • २०१३ – डी. लिट (एस. एन. डी. टी. युनिव्हर्सिटी मुंबई)
  • २००४ – सत्येंद्रनाथ बोस पदक (भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी)

 

फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेल्या भारतीय व्यक्ती

 

१) प्रा. रोहिणी गोडबोले (आयआयएससी, बेंगळूरू)

२) डॉ. इंदिरा नाथ (ए. आय. आय. एम. एस.)

३) गोवर्धन मेहता (हैदराबाद युनिव्हर्सिटी)

Contact Us

    Enquire Now