प्रधानमंत्री जनऔषधी योजना

प्रधानमंत्री जनऔषधी योजना

  • या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्येच प्रधानमंत्री भारतीय जनऔषधि परियोजनेअंतर्गत ८३०० केंद्र स्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले आहे
  • सुरुवात – नोव्हेंबर २००८
  • दर्जेदार व स्वस्त जेनेरिक औषधी प्रत्येकापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • २५ नोव्हेंबर २००८ ला अमृतसर येथे पहिले जनऔषधालय सुरू करण्यात आले.
  •  ही योजना केंद्रीय रसायने व खत मंत्रालयाच्या औषधी विभाग आणि सर्व केंद्रिय औषधी सार्वजनिक क्षेत्र उद्योग यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविली जाते.
  • या योजनेमुळे लोकांची औषधी खरेदी करताना सुमारे ५०% बचत होऊ लागली आहे.
  • देशातील सर्व जिल्हे या योजनेच्या अंतर्गत आले आहेत.
  • जनऔषधालय जो सुरू करतो त्याला MRP वर १६% ते २०% नफा मिळतो.
  • औषधालय उघडल्यानंतर पहिली १२ महिने मासिक विक्रीच्या १०% रक्कम (कमाल १०,००० रुपये) प्रोत्साहन म्हणून दिली जाते.
  • ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जनऔषधी केंद्रांची संख्या ८३५५ झाली आहे.

नविन लक्ष्य :

  •  सरकारने मार्च २०२४ पर्यंत जनौषधी केंद्रांची संख्या १०,००० पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Contact Us

    Enquire Now