पोषण आणि लसीकरण

पोषण आणि लसीकरण

  • सर्वसमावेशक राष्ट्रीय पोषण अहवालानुसार (२०१६-१८), ०-४ वर्षे वयोगटातील ३५ टक्के मुले खुंटलेली (stunted), १७ टक्के मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन (wasting) व ३३ टक्के मुले कमी वजनाची आहेत.

 

पोषणासंबंधी भारत सरकारचे उपक्रम

 

अ) अंगणवाडी सेवा योजना (१९७५): ०-६ वर्ष वयोगटातील मुले, गरोदर महिला तसेच स्तनदा माता हे योजनेचे लाभार्थी आहेत.

ब) पोषण अभियान (२०१७-१८) : २०१७-१८ ते २०१९-२० अशा टप्प्यात राबविले गेले. योजनेनुसार कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण ३८.४ टक्क्यांवरून २०२२ पर्यंत २५ टक्क्यांपर्यंत कमी करणे हे उद्दिष्ट. याअंतर्गत सप्टेंबर २०१८ हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला.

क) प्रधानमंत्री मातृवंदना योजना (जानेवारी २०१७): स्तनदा व गर्भवती मातांच्या आरोग्यात सुधारणा घडवणे तसेच या योजनेअंतर्गत ५००० रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

ड) किशोरवयीन मुलींसाठी योजना : याअंतर्गत ११ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींचा समावेश होतो.

इ) कुपोषण प्रमाण घटविण्यासाठी मिशन पोषण २.०

‍ई) ॲनिमिया मुक्त भारत : यात ५ ते ९ वर्षातील मुले व १० ते १९ वर्ष वयोगटातील मुलींचा समावेश होतो.

 

लसीकरणासंबंधी भारत सरकारची धोरणे

 

अ) सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (१९८५) : १२ लसींचा समावेश आहे.

१) क्षयरोग

२) घटसर्प

३) डांग्या खोकला

४) धनुर्वात

५) पोलिओ

६) देवी

७) हेपिटायटिस-बी

८) अतिसार

९) रुबेला १०) जपानी मेंदूज्वर

११) हिमोफिलस एन्फ्लूएंझा प्रकार-बी (Hib)

१२) न्युओकॉकल न्युमोनिया

ब) मिशन इंद्रधनुष (२५ डिसेंबर २०१४): २०१८ पासून Intensified Mission Indradhanush सुरू करण्यात आले असून या अंतर्गत २ वर्षांखालील बालके आणि गर्भवती स्त्रियांचे पुढील आजारांपासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण केले जाते.

१) पोलिओ (Poliomyelitis)

२) क्षयरोग (TB)

३) हिपेटायटिस बी

४) डांग्या खोकला (Pertussis)

५) घटसर्प (Diphtheria)

६) धनुर्वात (Tetanus)

७) देवी (Measles)

क) कोविड काळातील लसीकरण

  • को-विन (CO-Win) सपोर्ट
  • २४ × ७ राष्ट्रीय कॉल सेंटर्स
  • लक्ष्यगटांना घरपोच फॉलिक ॲसिडच्या गोळ्या उपलब्ध करून देणे. (६ ते ५९ महिन्यांचे बाळ, ५ ते ९ वर्षांची बालके, गरोदर व स्तनदा माता)

Contact Us

    Enquire Now