पॅरालिम्पिकमध्ये भारत

पॅरालिम्पिकमध्ये भारत

  • जपानची राजधानी टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिंम्पिकमध्ये क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.
  • ५ सुवर्णपदकांसह भारताने चोविसावे स्थान पटकावले.

इतिहास पॅरालिम्पिकचा

  • १९४८च्या लंडन ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनाच्या दिवशी स्टोक मांडेविले हॉस्पिटलचे डॉक्टर लुडविग गट्टमन यांनी दुसऱ्या महायुद्धात मणक्याच्या दुखापतीमुळे जायबंदी झालेल्या ब्रिटिश सैनिकांसाठी पहिल्या व्हीलचेअर स्पर्धेचे आयोजन केले.
  • त्यानंतर चार वर्षांनी या स्पर्धेत इस्रायली सैनिकांनी भाग घेतला.
  • या स्पर्धा ‘स्टोक मांडेविले गेम्स’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
  • पहिली अधिकृत पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा १९६० मध्ये इटलीची राजधानी रोममध्ये झाली.
  • १९८८ मध्ये पहिल्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धा सोल ऑलिम्पिकनंतर त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आणि तेव्हापासून या स्पर्धा उन्हाळी ऑलिम्पिकनंतर काही दिवसांनी त्याच शहरात आयोजण्याची प्रथा रूढ झाली.

 

भारताचे पॅरालिम्पिकमधील पहिले पदक

 

  • मुरलीधर पेटकर यांनी १९७२ मध्ये पश्चिम जर्मनीच्या हायडलबर्गमध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण प्रकारात भारतासाठी पहिले पदक सुवर्णपदकाच्या रूपाने पटकावले.
  • भारताने १९६८ पासूनच सहभाग घेण्यास सुरुवात केली.

 

२०१६ रिओ पॅरालिम्पिक स्पर्धा

 

  • या स्पर्धेत भारताने २ सुवर्ण, १ रजत, १ रौप्यपदक असे एकूण ४ पदके पटकावले.

 

२०२० टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा – (५ सुवर्ण, ८ रौप्य, ६ कांस्य)

 

  • कोविडमुळे २०२०च्या स्पर्धा उशिराने म्हणजेच २४ ऑगस्ट २०२१ ते ५ सप्टेंबर २०२१ या दरम्यान जपानची राजधानी टोकियो येथे भरविण्यात आल्या.
  • भारताचे १९ पदकांसह चोविसावा क्रमांक पटकावला.
  • ही स्पर्धा सुरू होईपर्यंत म्हणजेच २०१६ रिओ पॅरालिम्पिकपर्यंत भारताची एकूण पदकसंख्या १२ इतकी होती.
  • यंदा ५४ जणांचे पथक भारतातर्फे सहभागी झाले.
  • खेळाडू आणि पदकांची यादी पुढीलप्रमाणे

 

सुवर्णपदक – (पाच)

 

१) अवनी लेखारा – नेमबाजी – R२ १० मीटर एअर रायफल SH 1 महिला गट

२) सुमीत अंतिल – भालाफेक – F ६४ पुरुष गट

३) मनिष नरवाल – नेमबाजी – संयुक्त P४ ५० मीटर पिस्टल SH 1 – पुरुष गट

४) प्रमोद भगत – बॅडमिंटन – एकेरी SL 3 पुरुष गट

५) कृष्णा नागर- बॅडमिंटन – एकेरी SL पुरुष गट

 

रौप्य पदक (आठ)

 

१) भाविना पटेल – टेबल टेनिस – एकेरी क्लास – ४ महिला गट

२) निशाद कुमार – उंच उडी – T ४७ पुरुष गट

३) योगेश काथुनिया – थाली फेक – F५६ पुरुष गट

४) देवेंद्र झाझेरिया – भाला फेक – F ४६ पुरुष गट

५) मरिय्यपन थंगवलु – उंच उडी – T ६३ पुरुष गट

६) प्रवीण कुमार – उंच उडी – T ६४ पुरुष गट

७) सिंहराज अधाना – नेमबाजी – संयुक्त ५० मीटर

पिस्टल SH १ पुरुष गट

८) सुहास यथिराज – बॅडमिंटन SL ४ पुरुष गट

 

कांस्य पदक (सहा)

 

१) सुंदर सिंग गुर्जर – भालाफेक F ४६ पुरुष गट

२) सिंहराज अधाना – नेमबाजी – P१ १० मीटर एअर पिस्टल पुरुष गट

३) शरद कुमार – उंच उडी – T ६३ पुरुष गट

४) अवनी लेखारा – नेमबाज R८ ५० मीटर रायफल महिला गट

५) हरविंदर सिंग – तिरंदाजी – रिकर्व – पुरुष गट

६) मनोज सरकार – बॅडमिंटन – SL३ पुरुष गट

Contact Us

    Enquire Now