पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनास 125 वर्षे पूर्ण

पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनास 125 वर्षे पूर्ण

  • फ्रान्सच्या ल्यूमिअर बंधूंनी 28 डिसेंबर 1895 रोजी पॅरिस येथील कॅफेमध्ये चलच्चित्रांचा पहिला खेळ सादर केला.
  • रुळावरून धावणारी आगगाडी स्टेशनवर येते आणि बागेला माळी पाणी घालत आहे, अशा चलच्चित्रांच्या घटनेला 28 डिसेंबरला 125 वर्षे पूर्ण झाली.
  • ती प्रत्यक्षदर्शी चित्रे मूक होती आणि एक-दीड मिनिटांची होती. 
  • मूकपटाचे कथापट होण्यासाठी 7 वर्षे वाट पहावी लागली. 1902मध्ये कथापटाची सुरुवात झाली.
  • चलच्चित्राची लोकप्रियता पाहून 1896 रोजी ‘अरायव्हल ऑफ दि ट्रेन’ हा दीड मिनिटांचा मूकपट चित्रित केला गेला.
  • नंतर सहा महिन्यांनी 7 जुलै 1896 रोजी चित्रपटाचा पहिला खेळ मुंबई येथील वॉट्सन हॉटेल येथे झाला होता.
  • 1895 ते 1927 अशी 32 वर्षे चित्रपटात ध्वनी नव्हता. तरीही चित्रपटात सांगितलेली कथा प्रेक्षकांपर्यंत प्रतिमेद्वारे पोहोचत होती.
  • पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीसह ल्यूमिअर बंधू यांनी निर्मिलेल्या चित्रपटांचा ठेवा पुण्यातील चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यात आला आहे.

ल्यूमिअर बंधू

  • जन्म – 
    • ऑगस्टे ल्यूमिअर (19 ऑक्‍टोबर 1862, फ्रान्स)
    • लुईस जीन ल्यूमिअर (5 ऑक्टोबर 1864, फ्रान्स)
  • 1896 मध्ये अरायव्हल ऑफ दि ट्रेन हा दीड मिनिटांचा मूकपट चित्रित केला.
  • कॅमेऱ्याच्या भाषेत बोलायचे तर आगगाडी क्लोजअप मध्ये पुढे सरकताना दिसते.
  • गाडी क्लोजअपमध्ये येऊ लागल्यावर आता ती आपल्या अंगावर येणार, म्हणून हा खेळ पाहणारे पहिले प्रेक्षक कॅफेबाहेर पळाले हाेते.

Contact Us

    Enquire Now