पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर

  • केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांचा आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.
  • पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथे एकाच टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. तर पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे २०२१ रोजी जाहीर होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.

विधानसभा निवडणूक २०२१

राज्य/के.प्र. जागा टप्पे २०२१ निकाल
पश्चिम बंगाल २९४ २७ मार्च, १, ६, १०, १७, २२, २६, २९ एप्रिल २ मे २०२१
आसाम १२६ २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल
तामिळनाडू २३४ ६ एप्रिल
केरळ १४०
पुदुच्चेरी ३०

 

  • एकूण मतदारसंघ – ८२४
  • एकूण मतदार – १८ कोटी ६८ लाख
  • मतदान केंद्रे – २ लाख ७ हजार
  • पाचही राज्यांत आचारसंहिता लागू
  • सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर असणार
  • सर्व संवेदनशील मतदान केंद्रावर व्हिडिओ शूटिंग होणार.
  • सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण होणार
  • मतदानाच्या कालावधीत एका तासाने वाढ
  • २ मे रोजी पाचही राज्यातील निवडणुकांचे निर्णय जाहीर होणार
  • कोरोना महासाथीच्या काळात विधानसभा निवडणूक झालेले बिहार हे पहिले राज्य होते. तिथे पाच महिन्यांपूर्वी (ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२०) केंद्रीय निवडणूक आयोगाने यशस्वीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये सुद्धा सर्व नियम पाळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
  • जून २०२० मध्ये १८ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर बिहार विधानसभा निवडणूक हे निवडणूक आयोगासाठी महत्त्वाचे टप्पे होते, असेही त्यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांची ही अखेरची पत्रकार परिषद होती. कारण १३ एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.
  • विधानसभा निवडणुकीसह केरळमधील मलप्पुरम आणि तामिळनाडूतील कन्याकुमारी या दोन लोकसभा मतदार संघांत ६ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होईल आणि २ मे रोजीच मतमोजणी होणार आहे.
  • भारतीय निवडणूक आयोग : स्वायत्त, कायमस्वरूपी घटनात्मक अधिकार
  • स्थापना : २५ जानेवारी १९५०
  • कलम : ३२४ ते ३२९
  • निवडणुका नियंत्रण व देखरेख : राष्ट्रपती, संसद व विधानसभा निवडणुका.

Contact Us

    Enquire Now