पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद ?

पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद ?

  •  नुकतेच पश्चिम बंगालच्या विधानसभेने दोन तृतीयांश बहुमताने राज्यामध्ये वरिष्ठ सभागृह म्हणजे विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केला.
  •  आपल्या देशात संसदीय शासनप्रणाली आहे व केंद्रस्तरावर संसदेचे वरिष्ठ गृह ( राज्यसभा) आणि कनिष्ठ गृह (लोकसभा) अशी दोन सभागृहे आहेत.
  • राज्यघटनेच्या अनुच्छेद १६९ ने राज्यांमध्ये सुद्धा दोन सभागृहे असण्याची तरतूद केलेली आहे.
  • अनुच्छेद १६९ नुसार संसद एखाद्या राज्यामध्ये वरिष्ठ सभागृह म्हणून विधान परिषद स्थापन करू शकते किंवा नष्ट करू शकते.
  • परंतु त्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने (कनिष्ठ सभागृह) दोन तृतीयांश बहुमताने तसा ठराव संमत करायला हवा.

विधानपरिषद :

  • विधान परिषदेतील सदस्य अप्रत्यक्षरीत्या निवडले जातात.
  • घटनेच्या अनुच्छेद १७१ नुसार विधान परिषदेची किमान सदस्य संख्या ४० तर कमाल सदस्य संख्या संबंधित विधानसभेच्या एक तृतीयांश यापेक्षा जास्त नको.
  • प्रत्यक्ष सदस्यसंख्या संसदेद्वारे ठरवली जाते.
  • अप्रत्यक्षरीत्या निवडून आलेल्या सदस्यांचा वाटा खालीलप्रमाणे असतो.
  • १/३ : जिल्हा बोर्ड, पंचायत राज तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यामधून (MH मध्ये २२)
  • १/३ : विधानसभेच्या सदस्यांकडून विधानसभेचे सदस्य नसलेल्या व्यक्तींची निवड (MH मध्ये ३०)
  • १/१२ : राज्यामध्ये राहणारे आणि पदवी मिळून तीन वर्षे  झालेल्या पदवीधरांनी निवडून दिलेले ( पदवीधर मतदारसंघ) (MH मध्ये ७)
  • १/१२ :  राज्यात कमीत कमी तीन वर्षे माध्यमिक दर्जाच्या वर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या मतदारांकडून  निवडून  दिलेले (MH मध्ये ७)
  • १/६ : साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रांमधील विशेष तज्ज्ञ व्यक्ती राज्यपालांकडून नामनिर्देशित केल्या जातात. (MH मध्ये १२)
  • विधानपरिषद हे कायमस्वरूपी गृह आहे. म्हणजे ते विधानसभेसारखे बरखास्त होत नाही.
  • विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल ६ वर्षे असतो. (विधानसभा – ५ वर्षे)
  • विधान परिषदेचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.
  • निवृत्त सदस्य कितीही वेळा पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात.
  • विधानपरिषद एखादे विधेयक जास्तीत जास्त चार महिन्यांसाठी प्रलंबित ठेवू शकते. त्याबाबतीत विधान परिषदेला खूप कमी अधिकार आहेत.
  • अनेक तज्ज्ञांनी विधानपरिषदेवर दुय्यम चेंबर, खर्चिक अलंकार, पांढरा हत्ती अशा शब्दांत टीका केली आहे.
  • सध्या केवळ सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे. ती  राज्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि  तेलंगणा होत.
  • २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून टाकण्यात आल्यामुळे तेथील विधान परिषद रद्द करण्यात आली आहे.
  • २०२० मध्ये आंध्रप्रदेशच्या विधानसभेने त्यांची विधानपरिषद रद्द करण्याचा ठराव संमत केला आहे. परंतु अजून संसदेने तो ठराव संमत केला नाही; त्यामुळे तेथील विधान परिषद अस्तित्वात आहे.

Contact Us

    Enquire Now