पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७४ व्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७४ व्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे

    • पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्ट २०२० रोजी केलेेले भाषण सलग सातवे भाषण ठरले. यामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचे रूपांतर मेक फॉर वर्ल्ड यांसारख्या मुद्द्यांवर मत मांडले.

 

  • मोदींची राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा (NDHM) – 

 

    • याअंतर्गत प्रत्येक भारतीय नागरीकाला एक आरोग्यकार्ड (Health ID) देण्यात येईल. त्यामध्ये त्या व्यक्तीची आरोग्यासंबंधी सर्व माहिती साठविली जाईल. त्यासाठी नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी (NHA) ची स्थापना करण्यात येणार आहे. त्याद्वारे आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (AB-PMJAY) ची अंमलबजावणी केली जाणार आहे.
    • हे अभियान सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर चंदीगढ, लडाख, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार या ६ केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण देशभरात लागू होईल.

 

  • अंदमानसह निकोबार लक्षद्वीपपर्यंत इंटरनेट सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

 

    • यासाठी मोदींनी १००० दिवसांचे लक्ष ठेवले आहे.
    • यासाठी दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अंमलबजावणीची जबाबदारी असेल.

 

  • ऑप्टिकल फायबर

 

    • मोदींनी आपल्या भाषणात भारतनेट योजनेचा आढावा घेतला.
    • २०११ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क (NOFN) २०११ मध्ये सुरू केला.
    • या कार्यक्रमाचे नाव २०१५ मध्ये भारतनेट असे करण्यात आले.
    • याद्वारे ऑगस्ट २०२१ पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँडद्वारे एकमेकींना जोडण्यात येणार आहे. तसेच पुढच्या १००० दिवसांत सहा लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क पोहोचणार असल्याची घोषणा केली.

 

  • प्रोजेक्ट डॉल्फिन

 

  • हत्ती प्रकल्प, व्याघ्र प्रकल्प यांच्या धर्तीवर गंगा नदीतील डॉल्फिन वाचविण्यासाठी मोदींना ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ ची घोषणा केली.
  • २०१० साली गंगेमध्ये आढळणार्‍या डॉल्फिन्सला ‘राष्ट्रीय सागरी जीव’ हा दर्जा देण्यात आला आहे.
  • भारतात सध्या ३७०० डॉल्फिन्स आहे. 

जया जेटली समिती : जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीच्या निर्णयानुसार मुलींच्या विवाहाच्या वयाबाबत विचार केला जाणार आहे

Contact Us

    Enquire Now