न्यू डेव्हलपमेंट बँकेचे यूएई, ऊरुग्वे आणि बांगलादेश नवीन सदस्य

न्यू डेव्हलपमेंट बँकेचे यूएई, ऊरुग्वे आणि बांगलादेश नवीन सदस्य

  • १ सप्टेंबर २०२१ रोजी संयुक्त अरब अमिराती (यूएई), ऊरुग्वे आणि बांगलादेश या देशांना न्यू डेव्हलपमेंट बँकेद्वारा सदस्य म्हणून स्वीकारण्यात आले आहे.

पार्श्वभूमी :

  • ब्रिक्स गटातील ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे.
  • या बँकेची कल्पना ब्रिक्सच्या २०१२ मधील नवी दिल्ली येथे पार पडलेल्या चौथ्या शिखर परिषदेत भारताने सादर केली व त्या अनुषंगाने २०१५ मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली होती.

न्यू डेव्हलपमेंट बँक :

  • पूर्वी तिला ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक म्हणून ओळखले जायचे.
  • स्थापना: २०१५ (ब्रिक्सची सातवी शिखर परिषद, रशिया)
  • मुख्यालय: शांघाय (चीन)
  • अध्यक्ष: मार्कोस ट्राॅयजो
  • कार्य: ही बँक प्रामुख्याने कर्ज, हमी, इक्विटी सहभाग आणि इतर आर्थिक साधनांद्वारे सार्वजनिक किंवा खासगी प्रकल्पांना समर्थन देते.
  • संस्थापक सदस्य: ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका.
  • भाग भांडवल : ५० अब्ज डॉलर्स
  • उद्दिष्ट: सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत प्रकल्पांद्वारे राष्ट्रीय स्तरावर स्थापित केलेल्या विकास योजनांमध्ये योगदान देणे.
  • इतर कार्ये: एनडीबीने पाणी, स्वच्छता, वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, डिजिटल आणि सामाजिक पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या आपल्या पाच सदस्य देशांत ३० अब्ज डॉलर्स किंमतीच्या सुमारे १० प्रकल्पांवर स्वाक्षरी केली आहे.

सदस्यत्वासंबंधी :

  • बँकेचे सदस्यत्व वाढविण्याचे सर्वसाधारण धोरण २०१७-१८ मध्ये उघड करण्यात आले.
  • सदस्यत्वाचा विस्तार बँकेच्या दीर्घकालीन व्यवसाय वाढीसाठी व सदस्य देशांना त्यांच्या पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासासाठी आर्थिक सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
  • संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश या बँकेचे सदस्य असू शकतात मात्र ब्रिक्स देशांचा वाटा त्याच्या मतदान शक्तीच्या ५५ टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही.

ब्रिक्स (BRICS):

  • B – ब्राझील, R – रशिया, I – भारत, C – चीन, S – दक्षिण आफ्रिका
  • २००९ मध्ये पहिली बैठक रशिया येथे पार पडली.
  • २०१० साली दक्षिण आफ्रिका ब्रिक्समध्ये सामील झाला.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) किंवा जागतिक बँक यांना पर्याय म्हणून ही संस्था नावारूपास आली.

Contact Us

    Enquire Now