न्यूझीलंडने २०२१ अपेकची ऑकलँड समिट रद्द केली आणि व्हर्च्युअल समिटची निवड केली

न्यूझीलंडने २०२१ अपेकची ऑकलँड समिट रद्द केली आणि व्हर्च्युअल समिटची निवड केली 

  • न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विंस्टन पीटर्स यांनी ३० जून २०२० रोजी घोषणा केली की कोविड-१९ या साथीच्या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नियोजन आणि सुरक्षेच्या कारणास्तव २०२१ आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन (अपेक) मंच रद्द केला आणि समिट एक व्हर्च्युअल (आभासी) कार्यक्रम म्हणून आयोजित केले जाईल.
  • सरकारविरूद्धच्या हिंसक निषेधामुळे चिलीने २०१९ ची नेत्यांची बैठक रद्द केली आणि २०२० ची अपेकची व्हर्च्युअल समिट मलेशिया आयोजित करीत आहे.
  • न्यूझीलंडने परत आलेल्या नागरिक आणि रहिवाशांना वगळता प्रत्येक देशाच्या सीमा बंद केल्या आहेत.
  • आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन / अपेकबद्दल
  • अपेकची स्थापना १९८९ रोजी झाली असून त्याचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे.
  • पॅसिफिक महासागराभोवतीचे आणि पूर्व आशियाई देश अशा एकवीस राष्ट्रांची ही संघटना आहे.
  • सध्या अपेकचे चेअरमन मुहिद्दिन यासीन हे आहेत तर कार्यकारी संचालक डॉ. रेबेका फातिमा स्टा. मारिया या आहेत.
  • भारत अपेकचा सदस्य नाही आणि मुक्त व्यापारही नाही.
  • सध्या अपेकपैकी दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, थायलंड व मलेशिया या देशांबरोबर भारताचा उभयपक्षी व्यापारी करार आहे

Contact Us

    Enquire Now