नॉन – क्रिमीलेअरसाठी आता फक्त आई – वडिलांचेच उत्पन्न ग्राह्य

नॉन – क्रिमीलेअरसाठी आता फक्त आई – वडिलांचेच उत्पन्न ग्राह्य

  • नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्रासाठी संपूर्ण कुटुंबाऐवजी फक्त आई – वडिलांचेच उत्पन्न गृहीत धरण्यात येणार आहे.
  • याआधी संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न ग्राह्य धरत असत.
  • त्यात आई – वडिलांच्या उत्पन्नासह त्यांना शेती, नोकरी तसेच कुटुंबातील एखादी सदस्य सरकारी सेवेत असल्यास त्याचे उत्पन्न याशिवाय इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न, इत्यादींचा समावेश होत असे.
  • यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीसाठी आवश्यक ८ लाख उत्पन्न मर्यादा ओलांडल्यामुळे वंचित राहत होते.
  • ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्याची दखल घेऊन राज्याच्या बहुजन कल्याण मंत्र्यांनी या अटीत बदल करण्याचे ठरवले.
  • यासाठी ११ ऑगस्ट २०२० रोजी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव यांची बैठक झाली.
  • या बैठकीतच इतर मागासवर्गीयांना (OBC) आवश्यक नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्राकरिताच्या अटींमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र म्हणजे काय?

  • नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र म्हणजे उन्नत व प्रगत गटात (Cremy layer) गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • इतर मागास प्रवर्गातील ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना किंवा महिलांना महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र बंधनकारक असते.

Creamy Layer (उन्नत गट)

  • ही संकल्पना १९९३ मध्ये लागू करण्यात आली.
  • त्यावेळी स्थूल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. १ लाख होती.
  • नंतर २००४ मध्ये २.५ लाख रुपये २००८ मध्ये ४.५ लाख रुपये, २०१३ मध्ये ६ लाख रुपये, तर २०१७ मध्ये ८ लाखांपर्यंत वार्षिक स्थितीनुसार वाढवण्यात आली आहे.

 

घटनेतील तरतुदी

 

  • भारतीय संविधानातील कलम १५ (४) अन्वये, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांतील नॉन क्रीमीलेअर गटासाठी २७% आरक्षण
  • कलम १६ (४) अन्वये, सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना २७% आरक्षणाची तरतूद केली आहे.
  • संसदीय कायद्याने १९९३ मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली. (कलम – ३३८ (ब) – १०२ वी घटनादुरुस्ती, २०१८ नुसार घटनात्मक दर्जा प्राप्त

नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र कसे मिळते?

  • विहित नमुन्यातील अर्ज करावा, त्यावर १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे.
  • आवश्यक कागदपत्रे जोडणे
  • तहसीलदार कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात अर्ज व कागदपत्रे सादर करणे.

आवश्यक कागदपत्रे

  1. जातीचा दाखला
  2. तीन वर्षांचे उत्पन्नाचे उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र
  3. उत्पन्नाबाबतचे मागील तीन वर्षांचे पुरावे
  4. ओळखपत्र (पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना)

Contact Us

    Enquire Now