नवी दिल्ली येथे जगातील दुसरी मोठी जीन बँक

नवी दिल्ली येथे जगातील दुसरी मोठी जीन बँक

  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नॅशनल ब्यूरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (NBPGR), पुसा, नवी दिल्ली येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या नूतनीकरण केलेल्या अत्याधुनिक राष्ट्रीय जीन बँकेचे १६ अॉगस्ट २०२१ रोजी उद्घाटन केले.
  • उद्दिष्टे: वनस्पतींचे आनुवंशिक स्रोत विकसित करणे, शोधणे, सर्वेक्षण करणे आणि गोळा करणे हा एनबीपीजीआर स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.

राष्ट्रीय जीन बँक:

  • भविष्यातील पिढ्यांसाठी प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (PGR) ची बियाणे जतन करण्यासाठी १९९६मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय जीन बँकेमध्ये बियाणांच्या स्वरूपात सुमारे दहा लाख जर्मप्लाझम जतन करण्याची क्षमता आहे. 
  • ही विविध पीक गट जसे धान्य, बाजरी, औषधी आणि सुगंधी वनस्पती आणि मादक द्रव्ये इत्यादी साठवते.
  • सध्या ही बँक ४.५२ लाख अॅक्सेसन्सचे संरक्षण करत आहे, त्यापैकी २.७ लाख भारतीय जर्मप्लाझम आहेत आणि उर्वरित इतर देशांमधून आयात केले गेले आहेत.
  • नॅशनल ब्यूरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेसचे दिल्ली मुख्यालय आणि देशातील १० प्रादेशिक स्थानकांद्वारे इन-सीटू आणि एक्स-सीटू जर्मप्लाझम संवर्धनाची गरज भागवत आहे.

एनजीबीकडे दीर्घकालीन तसेच मध्यम मुदतीच्या संवर्धनासाठी चार प्रकारच्या सुविधा:

  1. बियाणे जीन बँक (-१८°से).
  2. क्रायो जीन बँक (-१७०°से. ते १९६°से).
  3. इन-विट्रो जीन बँक (२५°से).
  4. फील्ड जीन बँक. 

राष्ट्रीय जीन बँकेचे महत्त्व:

  • दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांच्या जातींची लोकसंख्या वाढविण्यासाठी किंवा प्रजातींमध्ये आनुवंशिक विविधता वृद्धिंगत करण्यास सहाय्य म्हणून संशोधक किंवा शेतकरी या ‘जीन’ बँकांमधून नमुने काढू शकतात .
  • जीन बँका असामान्य जनुक (विशेष गुण असलेले) पेशी किंवा जीव जतन करतात. जेव्हा काही रोगांचा प्रादुर्भाव होतो, जेव्हा हवामान बदलते किंवा इतर घटकांमुळे वनस्पती किंवा प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो, तेव्हा ही जनुके नंतर उपयुक्त ठरू शकतात.
  • आनुवंशिक विविधता पुनर्संचयित करण्यासाठी किंवा इतर जाती किंवा जातींमधील गुणधर्म ओळखण्यासाठी शेतकरी या बँकेतील संचयित पेशी किंवा ऊतींचा वापर करू शकतात.

Contact Us

    Enquire Now