‘नमामि गंगे’ प्रकल्पाचे शुभंकर ‘चाचा चौधरी’

‘नमामि गंगे’ प्रकल्पाचे शुभंकर ‘चाचा चौधरी’

  • गंगा तसेच इतर नद्यांच्या स्वच्छतेविषयी तरुण आणि लहान मुलांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी ‘नमामि गंगे’ प्रकल्पाचे शुभंकर म्हणून ‘चाचा चौधरी’ या लोकप्रिय काढून कॅरेक्टरचा वापर करण्यात येणार आहे.
  • याबाबतचा निर्णय ‘नमामि गंगे’ अभियानाच्या बैठकीत घेण्यात आला.
  • प्राणकुमार शर्मा यांना 70च्या दशकात ‘लोटपोट’ या लहान-मुलांच्या मासिकात पहिल्यांदा ‘चाचा चौधरी’ ही व्यक्तिरेखा रेखाटली. त्यानंतर या व्यक्तिरेखेने भारतीय कॉमिक्स जगतात इतिहास रचला.

‘नमामि गंगे’ कार्यक्रम

  • हा एक एकीकृत संवर्धन कार्यक्रम आहे.
  • भारत सरकारने या कार्यक्रमात जून २०१४ मध्ये मान्यता दिली.
  • हा कार्यक्रम नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि त्याच्या राज्य समकक्ष संस्थांमार्फत राबविला जाणार आहे.
  • यासाठी जलशक्ती मंत्रालय हे नोडल मंत्रालय आहे.
  • २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला २०१९ पर्यंत गंगा स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र ही मुदत २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती.
  • ‘नमामि गंगे’ – II
  • ‘नमामि गंगे’ अभियानाचा दुसरा टप्पा २०२२ मध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये गंगा तसेच तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात येईल.

Contact Us

    Enquire Now