देशातून मक्याची सहा वर्षांतील उच्चांकी निर्यात

देशातून मक्याची सहा वर्षांतील उच्चांकी निर्यात

  • बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आल्यामुळे देशातील मक्याची निर्यात उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
  • बांगलादेशाने 66 टक्के मक्याची निर्यात केल्याने मक्याच्या निर्यातीला चालना मिळाली आहे.
  • ॲपेडा या निर्यातविषयक संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 9.22 लाख टन मका निर्यात केला गेला.
  • 2012-13 मध्ये झालेली 47.11 लाख टनांची निर्यात ही बांगलादेशाला झालेली सर्वाधिक निर्यात होती.
  • भारतातील निरनिराळ्या राज्यांमध्ये मक्यासाठी वेगळा दर असतो. कारण मक्याची गुणवत्ता आणि त्यामधील आर्द्रतेचे प्रमाण यानुसार दर बदलतात.

ॲपेडा (APEDA – Agricultural and Processed Food Products Export Development Authority)

  • स्थापना – 13 फेब्रुवारी 1956
  • मुख्यालय – दिल्ली
  • अध्यक्ष – डॉ. एम. अंगमुथू

ॲपेडाची कार्ये :

  • निर्यातदार म्हणून मान्यता देऊन त्याचे रजिस्ट्रेशन करणे.
  • निर्यातीचे मानक व विनिर्दिष्ट तपशील सुचविणे.
  • आवश्यक माहिती व आकडेवारी गोळा करणे.
  • निर्यातीक्षम वस्तू उत्पादनांचा विकास करणे, उद्योगांना वित्तीय सहाय्य पुरविणे, सबसिडी किंवा भांडवल उपलब्ध करून देणे.
  • ॲपेडाच्या अनुसूचित वस्तू उत्पादनात पुढील उत्पादनाचा समावेश होतो – फळे, भाजीपाला, मटण, डेअरी उत्पादने, मध व साखर, कोको व चॉकलेट, तेलबिया, डाळी, औषधी वनस्पती इ.

Contact Us

    Enquire Now