देऊबा पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान

देऊबा पाचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा हे नेपाळचे पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवड
  • त्यांची नेमणूक पंतप्रधानपदी अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी केली.
  • ‘द हिमालयन टाईम्स’ या वृत्तपत्रानुसार राज्य घटनेच्या कलम ७६ (५) नुसार ही नेमणूक करण्यात आली आहे.
  • तत्कालीन पंतप्रधान ओली यांनी २१ मे रोजी प्रतिनिधी गृह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता, हा निर्णय घटनाबाह्य असल्याने पंतप्रधानपदी देऊबा यांची नेमणूक करावी असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

देशातील निवडणुका लांबणीवर :

  • नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रतिनिधी सभा पुनरुज्जीवित केल्याने १२ व १९ नोव्हेंबरला होणाऱ्या संसदीय निवडणुका देशाच्या निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या आहेत.
  • के. पी. शर्मा ओली यांचा निर्णय अवैध ठरवत सर्वोच्च न्यायालयाने देऊबा यांची पंतप्रधानपदी निवड केली. त्यामुळे तेथील निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या.

Contact Us

    Enquire Now