दुशान्बे घोषणापत्र

दुशान्बे घोषणापत्र

  • १७ सप्टेंबर २०२१ रोजी शांघाय सहकार्य परिषदेच्या राष्ट्र प्रमुखांची २१वी शिखर परिषद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तझाकिस्तानच्या दुशान्बे येथे पार पडली.
  • या बैठकीदरम्यान एससीओ सदस्य देशांनी अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि स्थिरतेला प्रोत्साहन देण्यासाठी दुशान्बे घोषणापत्र स्वीकारले.
  • या बैठकीचे अध्यक्ष तझाकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रहमोन हे होते; भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीदरम्यान भारताचे प्रतिनिधित्व केले.

दुशान्बे घोषणापत्राची रूपरेषा :

  • एससीओ सदस्य देशांनी अफगाणिस्तानला एक स्वतंत्र, तटस्थ, एकसंघ, लोकशाही आणि शांततापूर्ण राज्य तसेच दहशतवाद, युद्ध आणि ड्रग्जमुक्त म्हणून समर्थन व्यक्त केले आहे.
  • सर्व वांशिक गट आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व असलेल्या अफगाणिस्तानमधील सर्वसमावेशक सरकारचे समर्थन करणे.
  • दहशतवादी वित्तपुरवठा व त्याचा जगभरातील विस्तार रोखण्यासाठीच्या संयुक्त प्रयत्नांत वाढ करणे.
  • सदस्य देशांत संस्कृती आणि वारसा यांचे जतन आणि संवर्धन तसेच त्यांच्यात पर्यटनपूरक वातावरण वृद्धिंगत करणे.

शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation)

  • स्थापना : १५ जून २००१
  • मुख्यालय : बीजिंग, चीन
  • सदस्य देश : (८) चीन, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, तझाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत (२०१७), पाकिस्तान (२०१७)
  • या संघटनेला ‘पूर्वेकडील आघाडी (Alliance of East) असेही संबोधले जाते.
  • जगातील ४२ टक्के लोकसंख्या एससीओच्या सदस्य देशांमध्ये राहते.

Contact Us

    Enquire Now