दिल्ली – मेरठ जलद रेल्वे, मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेने 741 दशलक्ष डॉलर्सला मंजुरी दिली

दिल्ली – मेरठ जलद रेल्वे, मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेने 741 दशलक्ष डॉलर्सला मंजुरी दिली

  • ब्रिक्स बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’ने (NDB) दिल्ली-मेरठ जलद रेल्वे आणि मुंबई मेट्रोसह भारतातील पायाभूत प्रकल्पांसाठी 741 दशलक्ष डॉलर्सच्या निधीस मान्यता दिली आहे.
  • एनडीबीच्या संचालक मंडळाने दिल्ली-गाझियाबाद-मेरठ रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम (RRTs) प्रकल्पासाठी 500 दशलक्ष डॉलर्स आणि मुंबई मेट्रो रेल II (लाइन 6) प्रकल्पासाठी 241 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले.

दिल्ली-गाझियाबाद-मेरठ रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम (RRTs) प्रकल्प :

  • दिल्ली-गाझियाबाद आणि मेरठ यांना जोडणारा वेगवान रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर्सचा निधी वापरला जाईल. त्याची लांबी 82.15 कि.मी. (68.03 कि.मी. उंच आणि 14.12 कि.मी. भूमिगत) असेल. तर 25 स्थानके असतील.
  • रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम ताशी 180 कि.मी. साठी डिझाइन केले गेले आहे आणि यामुळे दिल्ली ते मेरठ दरम्यानचा प्रवास 60 मिनिटांनी कमी करेल.
  • यामुळे दिल्लीतील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि एक कार्यक्षम आणि टिकाऊ प्रादेशिक परिवहन व्यवस्था उपलब्ध होईल.

मुंबई मेट्रो रेल II (लाइन 6) प्रकल्प :

  • 241 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मुंबई शहरात 14.47 कि.मी. लांबीच्या रेल्वे लाइन 6 च्या अंमलबजावणीसाठी वापरला जाईल.
  • हे मुंबईतील अखंड सार्वजनिक वाहतुकीच्या नेटवर्कसाठी देखील योगदान देईल.
  • मेट्रो रेल प्रकल्प मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत राबविला जाईल.

इतर प्रस्तावांना मान्यता :

  • 1.03 अब्ज डॉलर्स किंमतीच्या एकूण प्रकल्पांना संचालक मंडळाने मान्यता दिली, ज्यात रशियन जल परिवहन क्षेत्र प्रकल्प (100 दशलक्ष डॉलर्स), रशियामधील टोल रस्ते कार्यक्रम (100 दशलक्ष डॉलर्स), रशियामधील पाणीपुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रम (100 दशलक्ष डॉलर्स) यांचा समावेश आहे.

अलिकडील संबंधित बातम्या :

  • 20 एप्रिल 2020 रोजी केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या गव्हर्नर बोर्डाच्या 5 व्या वार्षिक बैठकीत भाग घेतला.
  • 25 ऑगस्ट 2020 रोजी रशियन ब्रिक्सच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) क्रीडामंत्र्यांची पहिली बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली.

न्यू डेव्हलपमेंट बँक (ब्रिक्स) (NDB-BRICS) :

पार्श्वभूमी : बिक्स देशांचा शाश्वत विकास करण्यासाठी व शाश्वत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी NDB BRICSची स्थापना करण्यात आली.

स्थापना : ब्रिक्सच्या नवी दिल्लीतील 2012 मधील परिषदेत सामाईक बँक स्थापण्याचा विचार पुढे आला. 2014 मधील फोर्टालेझा (ब्राझील) येथे झालेल्या 6व्या परिषदेत NDB स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 जुलै 2014 ला झालेल्या या फोर्टालेझा परिषदेत NDB स्थापण्याच्या करारावर सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 7 जुलै 2015 ला उफा येथे झालेल्या परिषदेत कायदेशीर कार्यवाही पूर्ण होऊन NDB अस्तित्वात आली. 27 ऑगस्ट 2016 ला NDBने प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली.

मुख्यालय – शांघाय (चीन)

उद्देश – 1) ब्रिक्स देशांमधील पायाभूत सुविधा व शाश्वत विकासासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध करणे.

2) इतर उभरत्या आणि विकसनशील देशांना देखील आर्थिक स्रोत पुरविणे.

गव्हर्नर – पाउलो ग्डीज (ब्राझील)

Contact Us

    Enquire Now