दिल्ली मंत्रिमंडळाने पहिल्यांदाच ‘वृक्ष प्रत्यारोपण धोरण’ मंजूर केले

दिल्ली मंत्रिमंडळाने पहिल्यांदाच ‘वृक्ष प्रत्यारोपण धोरण’ मंजूर केले.

  • 9 ऑक्‍टोबर 2020 रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखालील दिल्लीच्या मंत्रिमंडळाने ‘वृक्ष प्रत्यारोपण धोरण’ मंजूर केले. 
  • असे धोरण मंजूर करणारे दिल्ली पहिलेच राज्य आहे.
  • या धोरणानुसार विकास किंवा बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित वृक्षांपैकी 80% वृक्ष पुनर्रोपण केले जातील व त्यांपैकी किमान 80% झाडे जगायला हवीत याची जबाबदारी  परवानगी घेणाऱ्या एजन्सीची असेल.
  • त्यासाठी दिल्ली सरकार एजन्सीजचे पॅनेल तयार करेल व संबंधित सरकारी विभाग त्यांच्याशी संपर्क साधतील. मात्र 1 वर्षानंतर 80% झाडे जगल्यासच या एजन्सीजला पैसे दिले जातील.

धोरणाविषयी महत्त्वाचे मुद्दे

    1. दिल्लीतील वायुप्रदूषणाविरुद्ध असलेली चळवळ ‘युद्ध, प्रदूषण के विरुद्ध’ चाच हे धोरण एक भाग आहे.
    2. झाड कापण्यासाठी किमान 10 रोपे लावणे आवश्यक. तसेच झाडाला एका जागेवरून उपटून दुसऱ्या जागेवर लावणे.
    3. सरकार व समित्यांनी प्रत्यारोपण केलेल्या झाडांवर नजर ठेवण्यासाठी व कामाची अचूकता प्रमाणित करण्यासाठी एक समर्पित वृक्ष प्रत्यारोपण कक्ष  तयार केला जाईल.

Contact Us

    Enquire Now