दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कर्नम मल्लेश्वरी यांची निवड

दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कर्नम मल्लेश्वरी यांची निवड

  • दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू होण्याचा मान प्रसिद्ध वेटलिफ्टर आणि पहिल्या महिला ऑलिम्पिक पदकविजेत्या कर्नम मल्लेश्वरी यांना देण्यात आला.
  • दिल्ली क्रीडा विद्यापीठ हा दिल्ली सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देऊन देशाचा नावलैकिक वाढवणे, खेळाडूंच्या प्रतिमेला चालना देणे या उद्देशाने क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
  • विविध खेळांमध्ये खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये ५० पदके जिंकून देशाचा गौरव वाढवावा. त्या दृष्टीने हे विद्यापीठ महत्त्वपूर्ण कामगिरी करेल.
  • किमान दहा खेळांमधील आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.
  • या विद्यापीठातून मिळणारी पदवी इतर मुख्य प्रवाहातील पदव्यांना समकक्ष असेल.
  • दिल्ली सरकारने २०१९ मध्ये दिल्ली स्पोट्‌र्स युनिव्हर्सिटी (DSu) स्थापन करण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले होते.

Contact Us

    Enquire Now