दहा राज्यांत बर्ड फ्लूचा शिरकाव

दहा राज्यांत बर्ड फ्लूचा शिरकाव

  • कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या राज्यांमध्ये आता बर्ड फ्लू हातपाय पसरत आहे.
  • महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली व उत्तराखंड या राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव.
  • महाराष्ट्र व दिल्लीने आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत व प्रशासनाकडून खबरदारीचे आदेश देण्यात आले आहे.
  • दिल्लीतील वेगवेगळ्या पार्कमध्ये 91 कावळे आणि 27 बदकांचा मृत्यू झाल्याने दक्षतेचा इशारा दिला आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील ठाणे, परभणी, रत्नागिरीत बर्ड फ्लूने पक्षी व कोंबड्याचा मृत्यू झाला आहे.
  • जिवंत पक्षी आयात करण्यावरदेखील बंदी जाहीर करण्यात आली आहे.
  • हिमाचलच्या पाँग धरण क्षेत्रात 215 स्थलांतरित पक्षी मृत झाल्याचे उघडकीस आले.

बर्ड फ्लूचे मानवात संक्रमण आढळलेले नाही

  • देशात अनेक ठिकाणी बर्ड फ्लू संक्रमण आढळले असले तरी मानवात संक्रमण आढळले नाही.
  • चिकन आणि अंडी योग्य पद्धतीने शिजवून खाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बर्ड फ्लू मानवांमध्ये कसा पसरतो?

  • संक्रमित पक्षी किंवा कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास मानवामध्ये संक्रमण पसरू शकते.
  • डोळे, नाक आणि तोंडाद्वारे मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश मिळवू शकतात.

बर्ड फ्लूची लक्षणे 

  • श्वास घेण्यास अडचण, कफ कायम राहणे.
  • डोकेदुखी
  • घशात सूज येणे.
  • स्नायू दुखणे, उलट्या, ओटीपोटात दुखणे.

बर्ड फ्लूविषयी (एव्हिएन इन्फ्लुएन्झा)

  • विषाणू – HSN1 किंवा HSN8 यामुळे होतो.
  • हा विषाणू बदके, कोंबड्या, मोर आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो.
  • 1997 मध्ये माणसांतल्या संसर्गाचे पहिले प्रकरण हाँगकाँगमध्ये आढळले होते.

Contact Us

    Enquire Now