दत्तात्रेय मारुती मिरासदार

दत्तात्रेय मारुती मिरासदार

  • जन्म – १४ एप्रिल १९२७ (अकलूज)
  • मृत्यू – २ ऑक्टोबर २०२१ (पुणे)

जीवनपरिचय

  • ज्येष्ठ साहित्यिक, सत्यकथा-अभिरुची, नवकथा, विनोदी कथा, ग्रामीण कथा इ. साहित्यातून कलेला आकार देणारे द. मा. मिरासदार यांचे नुकतेच निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

विशेष बाबी

  • त्यांची पहिली कथा ‘सत्यकथा’ लोकप्रिय ठरली.
  • त्यांची भोकरवाडीची चावडी दूरदर्शनवरून सर्वदूर पसरली.
  • भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते. 
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.
  • १९५२ मध्ये ते अध्यापन क्षेत्रात आले. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
  • १९६८ ते १९८९ या कालखंडात ‘गरवारे वाणिज्य महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
  • त्यांच्या लेखन कारकीर्दीची सुरुवात १९५० मध्ये ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘रानमाणूस’ या कथेपासून झाली.
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान दिले होते.
  • १९९८ मध्ये परळी-वैजनाथ येथे झालेल्या ७१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
  • पुण्यात झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षाच्या मिरासदार यांनी ‘भुताची गोष्ट’ ऐकवली होती.
  • ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटाच्या कथा पटकथा लेखनासह त्यांनी हेडमास्तराची भूमिकाही साकारली होती.
  • ‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती.
  • कॅनडा आणि अमेरिकेमध्ये २५ कार्यक्रमांचा विक्रमही त्यांनी केला होता. 
  • कादंबऱ्या – नावेतील तीन प्रवासी, सोनियाचा दिवस
  • नाटक आणि एकांकिका – सुट्टी व इतर एकांकिका, मी लाडाची मैना तुमची, गाणारा मुलुख
  • ललितलेख संग्रह – सरमिसळ, गप्पागण, बेंडबाजा
  • गाजलेले कथासंग्रह – माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म, फर्मास गोष्टी, जावईबापूंच्या गोष्टी, भोकरवाडीच्या गोष्टी, फुकट चकाट्या, विरंगुळा, नेम, मिरासदारी, हसणावळ, गुदगुल्या, हुबेहूब, गफलत स्पर्श, भोजनभाऊ, माकडमेवा, गावरान गोष्टी

गौरव

  • २०१३ – पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मीकी पुरस्कार
  • २०१४ – प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार
  • २०१५ – महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
  • २०१६ – पुलोत्सवातील कार्यक्रमात पु. ल. जीवनगौरव सन्मान

Contact Us

    Enquire Now