तुकाराम शंकर कुळकर्णी

तुकाराम शंकर कुळकर्णी

जन्म – 3 सप्टेंबर 1932 (कळमनुरी, हिंगोली)

निधन – 10 एप्रिल 2019

अल्पपरिचय :

  • मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकर्ता
  • 1961 साली कला शाखेतील पदवी प्राप्त केली
  • मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर औरंगाबाद मधील सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख
  • 1952 ते 1957 या काळात कवितालेखन
  • पु. शि. रेगेंच्या ‘छंद’ पासून ते ‘वाचा’ पर्यंतच्या ‘लिटल मॅगझिन’ चळवळीशी त्यांचा संबंध
  • 1995 पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य
  • 15 वर्षे त्यांनी ‘प्रतिष्ठान’ या मराठवाडा साहित्य परिषदेच्या मुखपत्राचे संपादन केले
  • संघटन कौशल्यामुळे साहित्य महामंडळ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिकांना प्रोत्साहन दिले

कथासंग्रह :

अ) सुरणाची वेदना (1955)

ब) रेखा (1960)

क) अखेरच्या वळणावर (1982)

काव्यसंग्रह :

कानोसा (1992)

इतर :

क्रांती मार्गावरील प्रवासी (1993), स्वातंत्र्योत्तर मराठी कविता:1960 ते 1980 (1994)

पुरस्कार व सन्मान :

2016 – महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

2002 – 23 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (औरंगाबाद)

Contact Us

    Enquire Now