तीन अपत्ये धोरणास चिनी सरकारची मंजुरी

 तीन अपत्ये धोरणास चिनी सरकारची मंजुरी

  • चीनमध्ये जन्मदर कमी झाला असून तीन अपत्ये जन्माला घालणाऱ्या जोडप्याला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कायदा चिनी सरकारने मंजूर केला आहे.
  • अशा जोडप्यांना सामाजिक व आर्थिक लाभ प्रदान केले जातील. ज्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची,आरोग्याची व इतर गरजांची पूर्तता करणे सोपे जाईल.
  • पाच वर्षांपूर्वी २०१६मध्ये चीनने त्यांच्या एक अपत्य धोरणामध्ये बदल करून दोन अपत्ये धोरणास मंजुरी दिली होती.
  • १९८० मध्ये चीनची लोकसंख्या एक अब्ज होत आली होती. त्यांच्या आर्थिक वाढीच्या दरावर ही वाढती लोकसंख्या परिणाम करेल या भीतीमुळे १९८०मध्ये चीनच्या साम्यवादी सरकारने “नागरिकांनी केवळ एक अपत्य जन्मास घालावे” असे धोरण अमलात आणले.
  • यामुळे अल्पावधीत त्यांची लोकसंख्या आटोक्यात आली. परंतु अलिकडच्या दशकांमध्ये चीनचा जन्मदर हा कमी झाला असून त्यांना लोकसंख्या लाभांश कमी प्राप्त होत आहे.
  • म्हणून त्यांनी हळुहळू लोकसंख्या वाढीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

Contact Us

    Enquire Now