तियानवेन – १ चीनची पहिली मंगळ मोहीम

तियानवेन – १ चीनची पहिली मंगळ मोहीम

  • २३ जुलै रोजी चीनने वेनचांग अंतराळयान प्रक्षेपण स्थळावरून आपली पहिली मंगळ मोहीम सुरू केली.
  • तियानवेनचा अर्थ स्वर्गीय प्रश्न आहे. चिनी कवी कु-युआन यांच्या कवितेतून हे घेण्यात आले आहे.
  • अवकाशयान ४० कोटी किमी पार करत मंगळावर पोचण्यासाठी सात महिने लागतील.
  • अवकाशयानाचे ऑर्बिटर, लँडर व रोव्हर असे तीन भाग आहेत.

तियानवेनचे उद्देश : 

१. व्यापक निरीक्षणासाठी मंगळाभोवती परिक्रमा करणे.

२. मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणे व रोव्हरच्या सहाय्याने नमुने गोळा करणे.

३. मंगळाची भूगोल शास्त्रीय रचना, वातावरण, माती, पाण्याचे निरीक्षण करणे.

  • २०११ मध्ये चीनने मंगळावर यिंगहुओ-१ शोधमोहीम पाठवण्याचा अयशस्वी प्रयत्न रशियाच्या सहाय्याने केला होता.

मंगळावर यशस्वी मोहीम करणारे देश :

  • १. अमेरिका, २. रशिया, ३. भारत, ४. युरोपियन युनियन

 

होप मार्स मिशन

  • १९ जुलै २०२० रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) हा मंगळावर यान सोडणारा व आंतरग्रहीय मोहीम राबवणारा पहिला अरब व पश्चिम आशियाई देश ठरला.
  • जपानच्या मदतीने तेथील तानेगाशिमा येथील लॉन्च पॅडवरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • HOPE म्हणजेच ‘अल-अमल’ (आशा) असे या अवकाशयानाचे नाव असून या मिशनचे नेतृत्व सारा-अल-अमिरी ही ३३ वर्षीय तरुणी करत आहे.
  • भारत, अमेरिका, रशिया, युरोपनंतर मंगळावर जाणारा UAE हा चौथा देश आहे.
  • HOPE अवकाशयान मंगळावर पोहोचण्याची तारीख फेब्रुवारी २०२१ (आजपासून सात महिने) असावी या उद्देशाने लाँच केली आहे.
  • फेब्रुवारी २०२१ ही संयुक्त अरब अमिरातीच्या ७ अमिरातींच्या एकत्रीकरणाचा सुवर्णमहोत्सव ५०वा वर्धापन दिन आहे.
  • १.३ वजनी HOPE अवकाशयान ५० कोटी कि.मी. पार करून मंगळावर उतरणार आहे. अवकाशयानावरील उपकरणाच्या सहाय्याने पृष्ठभागाची छायाचित्रे व वातावरणातील घटकांची माहिती गोळा करण्यात येईल.
  • मोहिमेची घोषणा UAE अध्यक्ष खलिफा बिन जायेद अल नहयान व उपाध्यक्ष शेख मोहम्मद बिन रशिद अल मक्तुम यांनी २०१४ला केली.
  • या मोहिमेची बांधणी मोहम्मद बिन रशिद अंतराळ केंद्रात सुरू झाली. ज्यासाठी त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ वर्कले, ऑरिझोना स्टेट विद्यापीठ, कॉलोरॅडो बोल्डर विद्यापीठाची नासाच्या मार्स एक्स्प्लोरेशन प्रोग्रॅम नॅलिसिस ग्रुपची मदत घेतली.

मंगळ मोहीम आखणारे इतर देश :

१. चीनचे तियानमेन-१ मिशन

२. नासाचे Mars २०२० मिशन

Contact Us

    Enquire Now