तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीत ईस्टर डफ्लो, रघुराम राजन यांचा समावेश

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीत ईस्टर डफ्लो, रघुराम राजन यांचा समावेश

  • तामिळनाडू सरकारने मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीत पुढील पाच महत्त्वपूर्ण व्यक्‍तींचा समावेश केला आहे –

अ) रघुराम राजन, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर

ब) ईस्टर डफ्लो, 2019 चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकप्राप्त

क) अरविंद सुब्रह्मण्यम्‌, भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार (2014-18)

ड) जीन ड्रीझ, विकास अर्थशास्त्रज्ञ

इ) एस. नारायण, माजी केंद्रीय अर्थ सचिव

 

समितीचे कार्यासाठी सरकारने दिलेल्या संदर्भ अटी –

 

अ) आर्थिक आणि सामाजिक धोरणात सहकार्य करणे

ब) सामाजिक न्याय आणि मानवी विकासासंबंधित मुद्दे

क) महिलांना समान संधी

ड) आर्थिक वाढ, रोजगार आणि उत्पादकता वाढविणे

ई) चांगल्या सेवा प्रदान करण्यासाठी राज्याची क्षमता सुधारणे

 

गरज –

 

  1. कोविडमुळे उद्‌भवलेले संकट 
  2. उच्च उत्पन्न, वित्तीय तूट तसेच कर्जाचे वाढते प्रमाण यामुळे उद्‌भवणारी अनिश्चित आर्थिक स्थिती हाताळणे.
  3. जलद आर्थिक वाढ, नवीन उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक न्याय, यांसारख्या जनतेच्या अपेक्षा हाताळणे.
  • उद्देश – या समितीच्या आधारे सरकार अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करेल तसेच आर्थिक वृद्धीचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतील याची खात्री.

रघुराम राजन –

  •  रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर (2013-16) 
  • बोर्ड ऑफ बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटचे उपाध्यक्ष (2015-16)
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ.

ईस्टर डफ्लो – 

  • दारिद्र्य निर्मूलन आणि विकास अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका, MIT, US
  • गेल्या दाेन दशकांपासून भारतात मुख्यतः तामिळनाडूमध्ये बालक तसेच मातांच्या आरोग्यावर संशोधन कार्य.
  • अभिजित बॅनर्जी आणि मायकल क्रेमर यांसमवेत 2019 चे अर्थशास्त्राचे नोबेल.

अरविंद सुब्रमण्यम – 

  • 2014 ते 2018 दरम्यान भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार.

जीन ड्रीझ – 

  • विकास अर्थशास्त्रज्ञ.

पुस्तके –  

अ) ॲन अनसर्टन ग्लोरी – इंडिया ॲण्ड इटस्‌ कॉन्ट्रॅडिक्शन्स (एक अनिश्चित वैभव – भारत आणि त्याचा विरोधाभास)

ब) सेन्स ॲण्ड सॉलिडॅरिटी – झोलावाला इकॉनॉमिक्स फाॅर एव्हरियन (संवेदना आणि एकता – झोलवाले अर्थशास्त्र प्रत्येकासाठी)

एस. नारायण – 

  • 1962 च्या तामिळनाडू केडरचे IAS अधिकारी
  • 2003 ते 04 पर्यंत पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार

पुस्तक – द्रविडियन इअर्स – वेलफेअर ॲण्ड पॉलिटिक्स इन तामिळनाडू

Contact Us

    Enquire Now