तमिळनाडू सरकारने ११ सप्टेंबर महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा

तमिळनाडू सरकारने ११ सप्टेंबर महाकवी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा

  • तमिळनाडू सरकारने तमिळ लेखक, कवी, समाजसुधारक, पत्रकार तसेच भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते सुब्रमण्यम भारती यांची पुण्यतिथी, ११ सप्टेंबर हा दिवस ‘महाकवी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
  • २०२१ या वर्षी त्यांची १००वी पुण्यतिथी आहे, यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.

याप्रसंगी आयोजित करण्यात आलेले उपक्रम

  • पुढील वर्षभरासाठी शताब्दीनिमित्त राज्यातील (तमिळनाडू) भारतीय मेमोरियल हाऊसमध्ये साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
  • राज्य सरकार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करेल, त्यात एक लाख रुपयांचे बक्षिस भारती युवा कवी पुरस्काराच्या माध्यमातून प्रदान करण्यात येईल.
  • ग्रामविकास विभागाद्वारे भारती यांच्या नावावर महिलांचे आजीविका मिशन राबविले जाणार आहे.
  • सुब्रमण्यम भारती यांच्या कविता आणि निबंधाचे संकलन असलेले ‘मंथिल उरीयी वेंडम’ हे पुस्तक तमिळनाडू सरकार यानिमित्त प्रकाशित करणार आहे.
  • ३७ लाख विद्यार्थ्यांना १० कोटी रुपयांच्या शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

सुब्रमण्यम भारती :

  • जन्म – ११ डिसेंबर १८८२ (एट्टियापुरम, मद्रास प्रांत)
  • मृत्यू – ११ सप्टेंबर १९२१
  • राष्ट्रीय चळवळीच्या काळातील भारतीय लेखक ज्यांना आधुनिक तमिळ शैलीचे जनक मानले जाते.
  • त्यांना ‘महाकवी भारतीयार’ म्हणूनही ओळखले जाते.

राष्ट्रीय चळवळीतील भूमिका :

  • १९०४ नंतर भारती हे तमिळ दैनिक ‘स्वदेशमित्रम’ मध्ये कार्य करण्यास सामील झाले.
  • राजकीय घडामोडींमुळे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाकडे वळले.
  • त्यांच्या क्रांतिकारी उत्कटतेची घोषणा करण्यासाठी त्यांनी ‘इंडिया’ नावाचे साप्ताहिक सुरू केले, हे तमिळनाडूतील पहिले वृत्तपत्र होते ज्यात व्यंगचित्रे छापली गेली.
  • त्यांनी ‘विजया’सारखे इतर काही जर्नल्स प्रकाशित आणि संपादित केले.
  • टिळक, व्ही. व्ही. अय्यर, बिपिनचंद्र पाल यांसमवेत आयएनसीच्या सभांना हजेरी लावून राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली.
  • त्यांचे बनारस (१९०५) आणि सुरत (१९०७) आधिवेशनातील भाषणांनी अनेक राष्ट्रीय नेते प्रभावित झाले.

महत्त्वाचे कार्य :

  • सुदेसा गीतांगल (१९००); कन्नान पट्टू (१९१७ – कृष्ण गीते); पांचाली सप्तम (१९१२); कुईलपट्टू (१९१२); पुडिया रशिया आणि गुन्नर्थम (बुद्धीचा रथ)
  • इंग्रजी प्रकाशने : अग्नि (१९३७)
  • आंतरराष्ट्रीय भारती उत्सव-२०२० : सुब्रमण्यम भारती यांच्या १३७ व्या जयंती निमित्त वानविल सांस्कृतिक केंद्र (तमिळनाडू) ने या उत्सवाचे आयोजन केले होते.
  • विद्वान श्री. सिनी विश्वनाथन यांना २०२० चा भारती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • १९९४ पासून वानविल सांस्कृतिक केंद्राद्वारे हा पुरस्कार दिला जातो.

Contact Us

    Enquire Now