डॉ. काजल चक्रबर्ती यांना २०२० चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर

डॉ. काजल चक्रबर्ती यांना २०२० चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर

  • केंद्रीय सागरी मच्छिमारी संशोधन संस्थेतील (CMFRI) मुख्य वैज्ञानिक डॉ. काजल चक्रबर्ती यांना भारतीय अन्न संशोधन परिषदेचा (Indian Council of Agricultural Research) नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • सागरी शैवालापासून त्यांनी विविध जीवनशैलीजन्य रोगावर उपचार ठरू शकतील अशा औषधी पोषक उत्पादनांची निर्मिती केली.
  • त्यांचे कृषी पर्यंतचे शिक्षण बंगालमध्ये तर पदव्युत्तर शिक्षण व पीएचडीचे काम ICMR मधून केले.

चक्रबर्ती यांच्या संशोधनाची वैशिष्ट्ये

  • त्यांनी पोषण व औषध या दोन्ही दिशांनी काम केले आहे. औषधी पोषक उत्पादने त्यांनी सागरी शैवालापासून तयार केली.
  • हाडांचा ठिसूळपणा हा अलिकडे वाढत असलेला रोग, कारण आपल्याला अन्नातून पुरेशी पोषके मिळत नाहीत, यावर त्यांनी काम केले आहे.
  • अँटीऑस्टीपोरोटिक द्रव्ये त्यांनी शोधले आहे.
  • हृदयाचा संधिवात, टाईप २ मधुमेह, डिसुलिपीडडिमिया (जास्त कोलेस्टॅरॉल), अतिरक्तदाब, हायपरथायरॉडिझम यावर त्यांनी पोषकांचे उपाय शोषले आहेत.
  • जीवाणूजन्य आजारावरही त्यांनी काम केले असून हेटेरॉफिक जीवाणूचा वापर त्यांनी अनेक औषधांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंवरही केला आहे.
  • सागरातील पदार्थांचा वापर अन्न रसायनशास्त्रासाठी करून त्यातून नवीन उत्पादने तयार करण्यात त्यांनी मोठे यश मिळविले आहे.
  • “कॅडलमिन” हा त्यांनी हरित शैवालापासून तयार केलेला अर्क अनेक रोगांवर गुणकारी ठरला आहे.

 

चक्रबर्ती यांना मिळालेले पुरस्कार

 

  • सी. वी. कुलकर्णी तरुण वैज्ञानिक पुरस्कार
  • टी. जे. पांडियन पुरस्कार
  • ए. जे. मॅटी पुरस्कार
  • प्राण व्होरा पुरस्कार

नॉर्मन बोरलॉग पुरस्काराबद्दल

  • पाच वर्षांतून एकदा हा पुरस्कार दिला जातो.
  • १० लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.
  • हा पुरस्कार मिळालेल्या वैज्ञानिकास पुढील पाच वर्षांच्या संशोधनासाठी १.५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते.

Contact Us

    Enquire Now