डॉ. कल्याण बॅनर्जी

डॉ. कल्याण बॅनर्जी

जन्म : १९३८

मृत्यू : १६ एप्रिल २०२१

  • राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) माजी संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले.
  • ते ८३ वर्षांचे होते.
  • १९८८ ते १९९७ या काळात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
  • बॅनर्जी हे विषाणू विज्ञान, लसीकरण आणि साथीचे रोग या विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ होते.
  • डॉ. बॅनर्जी हे मुळचे कोलकाता येथील होते. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून १९६१ मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. १९६८ मध्ये पी. एचडी पूर्ण केली.
  • १९७३ पासून राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत कार्यरत होते.
  • डास गटातील डेंग्यू विषाणूचे जनुकीय मार्कर सर्वप्रथम डॉ. बॅनर्जी यांनी निश्चित केले.
  • विषाणूचा उगम आणि प्रसार हा त्यांचा अभ्यासाचा भाग होता.
  • टिश्यू कल्चर प्रकारात कायसनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) वरील लस सर्वप्रथम त्यांनी तयार केली.
  • जागतिक आरोग्य संघटनेसारख्या महत्त्वाच्या संघटनाच्या वैज्ञानिक सल्लागार गटामध्ये समावेश होता.
  • पश्चिम भारतातील एचआयव्ही संसर्गाच्या प्रसाराचा सखोल अभ्यास होता.
  • तुलसी रामायण आणि संस्कृत या विषयामध्ये त्यांचा व्यासंग होता.

पुरस्कार

  • २००९ – पद्मश्री – वैद्यकीय क्षेत्रातील विशिष्ठ सेवेबद्दल

Contact Us

    Enquire Now