डॉ. अँटनी हेवीश

डॉ. अँटनी हेवीश

  • जन्म – ११ मे १९२४, युनायटेड किंग्डम
  • मृत्यू – २३ सप्टेंबर २०२१

 

जीवन परिचय

 

  • रेडिओ लहरींच्या माध्यमातून अवकाशाचा विनाअडथळा वेध घेणे यासाठी नोबेल मिळणारे वैज्ञानिक डॉ. अँटनी हेवीश यांचे निधन झाले.
  • त्यांनी ‘पल्सार’ म्हणजे स्पंदक ताऱ्यांचा शोध लावला होता.
  • रेडिओ दुर्बीण तयार करून पल्सारमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ लहरीच्या माध्यमातून अवकाशाचा विनाअडथळा वेध घेतला.
  • त्यासाठी त्यांना मार्टीन रायल यांच्यासमवेत १९७४ चा नोबेल पुरस्कार मिळाला होता.
  • दुसऱ्या जागतिक महायुद्धात लढाऊ विमाने रडारपासून कशी वाचवायची या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता.
  • केंम्ब्रिज रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ग्रुप या संस्थेने १९६८ रोजी ‘नेचर’ मध्ये डॉ. हेवीश यांचा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता.
  • फ्रॅंकलिन इन्स्टिट्यूटने पल्सारच्या शोधाचे श्रेय बेल व हेविश या दोघांना दिले.
  • हेविश रेडिओ खगोलशास्त्र या विषयाचे केम्ब्रिज विद्यापीठात प्राध्यापक होते.
  • १९७१-८९ काळात ते मुलार्ड रेडिओ खगोलशास्त्र वेधशाळेचे प्रमुख होते.

Contact Us

    Enquire Now