डिजिटल पेमेंटसची ५ वर्षातील वाढ ३४३४.५६ कोटींपर्यंत परकीय चलन, सोन्याच्या राखीव व्यवस्थापनासाठी आरबीबाय NGTA स्वीकारणार

डिजिटल पेमेंटसची ५ वर्षातील वाढ ३४३४.५६ कोटींपर्यंत परकीय चलन, सोन्याच्या राखीव व्यवस्थापनासाठी आरबीबाय NGTA स्वीकारणार

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या, ताज्या आकडेवारीनुसार २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान डिजिटल पेमेंट्‌स ५५.१%च्या चक्रवाढ वार्षिक वाढीने वाढले असून ते आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ५९३.६१ कोटी रु. होते, ते वाढून आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ३४३४.५६ कोटी रु. इतके झाले आहे.
  • २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांच्या काळात मूल्यांची किंमत ९२०.३८ लाख कोटी रुपयांवरून वाढून १६२३.०५ लाख कोटी रुपये एवढी झाली आहे.
  • या कालावधीत वार्षिक वाढीचा दर हा १५.२% इतका होता.
  • कार्ड वापराच्या टक्केवारीनुसार, त्यांचा पेमेंटसाठी वाढीव वापर केला जात आहे. डेबिट कार्डचा वापर क्रेडिट कार्डच्या वापरापेक्षा आर्थिक वर्ष २०१६ मध्ये २० टक्क्यांवरून ते आर्थिक वर्ष २०२० मध्ये ४५ टक्क्यांपर्यंत वाढला.
  • डिजिटल व्यवहारांमध्ये वर्षानुवर्षे झालेली वाढ

वर्ष डिजिटल देयके मूल्य

२०१५-१६ ५९३.६१ कोटी ९२०.३८ लाख कोटी

२०१६-१७ ९६९.१२ कोटी ११२०.९९ लाख कोटी

२०१७-१८ १४५९.०१ कोटी १३६९.८६ लाख कोटी

२०१८-१९ २३४३.४० कोटी १६३८.५२ लाख कोटी

२०१९-२० ३४३४.५६ कोटी १६२८.०५ लाख कोटी

  • हे लक्षात घ्यावे की, आर्थिक वर्ष २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये डिजिटल पेमेंट्‌सच्या व्हॅल्यूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर मूल्यांची किंमत २०१९ मध्ये १६३८.५२ लाख कोटींवरून घसरून २०२० मध्ये १६२३.०५ लाख कोटींवर गेली.
  • एकूणच अर्थव्यवस्थेतील घसरणीमुळे लोकांना कमी खर्च करण्यास आणि रोखीची बचत करण्यास भाग पाडले.

डिजिटल पेमेंट्‌सला कोणत्या घटकांमुळे गती मिळाली

  • नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (NEFT) रिसल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आणि इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम (ECS)
  • नोव्हेंबर २०१६मध्ये सर्व ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची नोटबंदी
  • युनिफाईड पेमेंट्‌स इंटरफेस (UPI) आधारित पेमेंट्‌स तसेच ॲप आधारित पेमेंट्‌स्चा विकास
  • २०१९ पासून फक्‍त EMV (युरोप, मास्टरकार्ड आणि व्हिसा) चिप आणि पिन आधारित डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर अनिवार्य

परकीय चलन, सोन्याच्या राखीव व्यवस्थापनासाठी RBI NGTA स्विकारणार

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने कामकाज सुधारण्यााठी भारतातील परकीय चलन आणि सोन्याचा साठा व्यवस्थापित करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन ट्रेझरी ॲप्लिकेशन (NGTA) स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या संदर्भात RBI ने पात्र विक्रेत्यांकडून निविदा मागविल्या आहेत. मुख्य निविदादाराची २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२०मध्ये किमान वार्षिक उलाढाल ४७५ कोटी रुपये असावी.

नेकस्ट जनरेशन ट्रेझरी ॲप्लिकेशन (NGTA)

  • हे वेब आधारित ॲप्लिकेशन आहे जे नवीन उत्पादने आणि सिक्युरिटीजची ओळख करण्यास, प्रमाणता, गतिशीलता आणि लवचिकता प्रदान करण्यास मदत करते.
  • याशिवाय बहुचलन व्यवहारांना आणि फिक्स्ड इन्कम (FI), फॉरेक्स (FX), मनी मार्केट (mm) आणि गोल्ड यासारख्या व्यवहारांना समर्थन देते.
  • हे व्यापार व्यासपीठावरून सुरक्षा/कराराशी संबंधित सर्व माहिती आपोआप आणू शकेल.
  • या व्यतिरिक्‍त हे पोर्ट फोलिओ व्यवस्थापन, कार्य बल व्यवस्थापन, भांडार व्यवस्थापन आणि विविध तृतीय पक्ष प्रणालीचे एकत्रिकरण करण्यास मदत करेल.

लक्षात घ्यावयाचे मुद्दे

  • २ ऑक्टोबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ३.६१८ अब्ज डॉलर्सवरून वाढून ५४५.६३८ अब्ज डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचला.
  • सोन्याच्या साठ्यातही याच आठवड्यात ४८६ दशलक्ष डॉलर्सची वाढ होऊन ती ३६.४८६ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

अलिकडील संबंधित

  • २ सप्टेंबर २०२० रोजी लघु उद्योग विकास बँक (SIDBI) ने राज्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) पर्यावरण प्रणाली विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य करार केला.

भारतीय रिझर्व बँक (RBI)

  • स्थापना – १ एप्रिल १९३५ (सर यंग हिल्टन समितीच्या शिफारसीवरून)
  • फक्‍त चलनाच्या नोटा छापण्यासाठीच RBI जबाबदार आहे, नाणी भारत सरकारद्वारे छापली जातात.
  • डॉ. मनमोहन सिंग हे एकमेव पंतप्रधान आहेत, ज्यांनी RBIचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले आहे.
  • मुख्यालय – मुंबई

                        शक्‍तिकांत दास

Contact Us

    Enquire Now