ट्रम्प यांची न्यायालयीन लढाई संपुष्टात

ट्रम्प यांची न्यायालयीन लढाई संपुष्टात

  • अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत निकालास आव्हान देणारी ट्रम्प यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
  • टेक्सासचे ॲटर्नी जनरल ‘केन पॅक्स्टन’ यांनी ट्रम्प यांच्या वतीने याचिका दाखल केली होती. त्यात जॉर्जिया, मिशिगन अशा ४ राज्यांच्या निकालांना आव्हान देण्यात आले होते.
  • याचिकेला रिपब्लिकन पक्षाच्या १२६ सदस्यांचा पाठिंबा होता.
  • याचिकेत कोणताही दखलपात्र मुद्दा नसून निवडणुकीबद्दल केलेला दावा न्यायालयात टिकणारा नसल्याने न्यायाधीश सॅम्युअल ॲलिटो, क्लॅरेन्स थॉमस यांनी ती अमान्य केली.
  • अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक प्रतिनिधी मते (३०६) मिळवून जो बायडेन यांनी आधीच निर्णायक विजय मिळवला आहे.
  • अध्यक्ष बनण्यासाठी २७० मतांची गरज असते.
  • ट्रम्प यांना २३२ मते मिळाली आहेत.
  • निवडणुकीत बायडेनच्या साथीदार ‘कमलादेवी हॅरिस’ या पहिल्या महिला तसेच भारतीय-आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या उपाध्यक्ष ठरल्या.
  • बायडेन व हॅरिस २० जानेवारी २०२१ रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची शपथ घेतील.

अमेरिकेतील अध्यक्षपदाबद्दल

  • अध्यक्ष हा ४ वर्षांच्या कालासाठी राज्यप्रमुख व सरकारप्रमुख असतो.
  • Electoral College पद्धतीनेच अध्यक्ष-उपाध्यक्ष थेट मतदारांकडून निवडला जातो.
  • प्रत्येक राजकीय पक्ष आपापला अध्यक्षीय-उपाध्यक्षीय उमेदवार जाहीर करतो व मतदार त्यांच्या संघाला मतदान करतात.
  • देशद्रोह, लाचखोरी, अन्य उच्च गुन्हेगारी किंवा गैरवर्तन यामध्ये दोषी आढळल्यास त्यांना पदावरून काढून टाकण्यात येते.
  • भारताचे उपराष्ट्रपती पद अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदावरून घेण्यात आले आहे.

Contact Us

    Enquire Now