झिका व्हायरस

झिका व्हायरस

  • गेल्या आठवड्यापासून केरळमध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
  • खबरदारी म्हणून कर्नाटक राज्य सरकारने राज्यामध्ये या  व्हायरससंबंधी काही मार्गदर्शक सूचना जाहीर   केल्या

व्हायरससंबंधी :

  • हा व्हायरस Flavivirus  या गटातील असून तो Aedes  या डासाद्वारे पसरतो
  • याच डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया व पीतज्वर  हे आजार होतात.
  • दोन प्रकारच्या Aedes  डासांमुळे  झिका व्हायरस पसरतो
  • उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये Aedes aegypti  तर तुलनेने थंड प्रदेशांमध्ये Aedes albopictus
  • हा  डास सहसा दिवसा किंवा संध्याकाळी चावतो.
  • साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये तो त्याची अंडी घालतो.
  • झिका व्हायरस हा गरोदर आईकडून बाळाकडे संक्रमित होऊ शकतो. तसेच रक्तदान,अवयव दान लैंगिक संबंध यामुळेसुद्धा संक्रमित होऊ शकतो.

पार्श्वभूमी:

  • झिका व्हायरस सर्वप्रथम १९४७ मध्ये युगांडा देशातील झिका जंगलामध्ये एका Rheasus माकडात सापडला.
  • १९५२ मध्ये युगांडा आणि टांझानियामध्ये तो सर्वप्रथम मनुष्यामध्ये आढळला.
  • २००७ मध्ये पॅसिफिक प्रदेशात फ्रेंच पॉलिनेशिया या बेटांवर सर्वप्रथम त्याचा उद्रेक (outbreak) झाला.
  • त्यानंतर अनेक देशांमध्ये असे उद्रेक दिसून आल्याने २०१६ साली जागतिक आरोग्य संघटनेने झिका व्हायरस ही एक जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली.

लक्षणे :

  • झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखीच  परंतु कमी तीव्रतेची असतात.
  • त्यामध्ये स्नायू आणि सांधे दुखणे, ताप, शरीरावर लाल चट्टे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.
  • अनेकदा नेमकेच जन्म झालेल्या बाळांमध्ये Microcephaly हा आजार दिसून येतो. यामध्ये जन्मताच बाळाचे डोके खूप छोटे असते व त्याच्या मेंदूचा अतिशय कमी विकास झालेला असतो. बऱ्याचदा बाळ दगावण्याची सुद्धा शक्यता असते.

उपचार :

  • साधारणतः २ ते ७ दिवसांमध्ये रुग्ण बरा होऊन जातो.
  • या व्हायरसवर आतापर्यंत कोणतीही लस आलेली नाही. परंतु साधारण उपचारांनीसुद्धा हा आजार बरा होतो. उदा. भरपूर पाणी पिणे, आराम करणे, ताप आणि दुखण्याच्या गोळ्या खाणे यांनी सुद्धा रुग्ण बरा होतो.
  • २०१६ मध्ये भारत बायोटेक, हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी या व्हायरसवर २ लसी तयार केल्याचा दावा केला होता. परंतु अजून त्यांना परवानगी मिळायची बाकी आहे.

Contact Us

    Enquire Now